Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |3 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३ जुलै चालू घडामोडी
स्पेनचा माजी फुटबॉलपटू सेस्क फॅब्रिगासची निवृत्ती
- स्पेनचा माजी तारांकित मध्यरक्षक सेस्क फॅब्रिगासने जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीनंतर फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. २०१०च्या विश्वचषक विजेत्या स्पेन संघात फॅब्रिगासचा समावेश होता. आता ३६ वर्षीय फॅब्रिगास इटलीतील संघ कोमोचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.
- बार्सिलोनाच्या अकादमीचे फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर फॅब्रिगास इंग्लंडमधील आर्सेनल क्लबमध्ये दाखल झाला. फॅब्रिगासला वयाच्या १६व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने ऑक्टोबर २००३मध्ये लीग चषकात व्यावसायिक कारकीर्दीतील पहिला सामना खेळला. त्या वेळी आर्सेलनकडून खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. पुढे त्याने आर्सेनलचे कर्णधारपदही भूषवले, पण २०११मध्ये त्याने बार्सिलोनाकडे परतण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना त्याने २०१२-१३मध्ये ला लीगचे जेतेपद पटकावले. मात्र, सामने खेळण्याची सातत्याने संधी न मिळाल्याने त्याने बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडमधील चेल्सी संघाने त्याला खरेदी केले. चेल्सीकडून त्याने अप्रतिम कामगिरी केली. चेल्सीने २०१५ आणि २०१७मध्ये प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले होते. चेल्सीच्या या यशात फॅब्रिगासची भूमिका महत्त्वाची होती.
- चेल्सीकडून पाच हंगामांत खेळल्यानंतर फॅब्रिगासला २०१९मध्ये फ्रेंच क्लब मोनाकोने आपल्या संघात दाखल करून घेतले. मोनाकोकडून तो ६८ सामने खेळला. त्यानंतर गेल्या हंगामापूर्वी त्याला इटलीतील कोमो क्लबने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले. मात्र, या क्लबकडून एक वर्ष खेळल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. फॅब्रिगासने क्लब कारकीर्दीत ७३८ सामने खेळताना १२५ गोल नोंदवले.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर फॅब्रिगासने ११० सामन्यांत स्पेनचे प्रतिनिधित्व करताना १५ गोल केले. २०११मध्ये विश्वचषक, तसेच २०१८ आणि २०१२मध्ये युरोपीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेन संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.
जीएसटी संकलन १.६१ लाख कोटींवर
- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन जूनमध्ये १२ टक्के वाढून १.६१ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या वर्षी जूनमध्ये ‘जीएसटी’तून १.४४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची गेल्या सहा वर्षांतील ही चौथी वेळ आहे.
- सहा वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै २०१७ रोजी अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यानंतर आतापर्यंत जीएसटी संकलनाने चौथ्यांदा १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट झाले.
- सरलेल्या जूनमध्ये एकूण १,६१,४९७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. यंदाच्या महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) ३१,०१३ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ३८,२९२ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवाकरापोटी ८०,२९२ कोटी रुपये (आयात वस्तूंवर जमा केलेल्या ३९,०३५ कोटी रुपयांसह) आणि ११,९०० कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या १,०२८ कोटी रुपये उपकरासह) जमा झाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत सरासरी मासिक जीएसटी संकलन अनुक्रमे १.१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६९ लाख कोटी होते. जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत १४ वेळा ते १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर जीएसटीची अंमलबाजवणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा जीएसटी संकलन १.५० लाख कोटी रुपयांहून अधिक आणि चौथ्यांदा १.६० लाख कोटींहून अधिक नोंदवले गेले आहे.
संसदेचे अधिवेशन २० जुलैपासून
- संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैला सुरू होऊन ११ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी दिली. ही घोषणा करताना जोशी यांनी राजकीय पक्षांना या अधिवेशनादरम्यान फलदायी चर्चेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा जोरदार पुरस्कार केला असून, या मुद्यावर केंद्रात वेगाने हालचाली सुरू असतानाच हे अधिवेशन होत आहे.
- पावसाळी अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत सुरू होऊन, नंतर नव्या इमारतीत स्थलांतरित होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या इमारतीचे उद्घाटन मोदी यांनी २८ मे रोजी केले होते.
- या अधिवेशनात सरकार दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (सुधारणा) अध्यादेशाबाबत विधेयक मांडण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारला ‘सेवा’ संबंधित प्रकरणांत अधिक कायदेविषयक आणि प्रशासकीय अधिकार देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या अध्यादेशामुळे निरस्त झाला होता. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयकही अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये बोल्सोनारोंवर आठ वर्षे निवडणूक बंदी
- ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना २०३० पर्यंत निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली. ब्राझीलच्या सर्वोच्च निवडणूक न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना २०२२ च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर, सार्वजनिक माध्यमांचा गैरवापर तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीबाबत निराधार संशय निर्माण केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आता आठ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.
- ६८ वर्षीय बोल्सोनारो यांना २०२६ च्या निवडणुकीत राजकीय पुनरागमनाची आशा होती. या न्यायालयाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने पाच विरुद्ध दोन मतांनी बोल्सोनारोंना अपात्र ठरवले. बोल्सोनारो यांनी सरकारी संपर्क माध्यमांचा आपल्या सत्तेद्वारे गैरवापर करून आपला प्रचार केला. तसेच मतदान प्रणालीबाबत मतदारांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण केले, या आरोपांच्या सतत्येबाबत पाच न्यायमूर्तीनी सहमती, तर दोन न्यायमूर्तीनी विरोधात मत नोंदवले.
- बोल्सोनारो यांनी म्हटले आहे की, आपण कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा त्यांचा विचार आहे. विद्यमान अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा यांनी २०२२ च्या निवडणुकीत बोल्सोनारो यांना पराभूत केल्यानंतर हिंसाचार झाला होता.
’समृद्धी’ मार्गावरील अपघातांच्या प्रश्नावर गडकरी दिल्लीत काय म्हणाले होते?
- नागपूर ते शिर्डी समृद्धी मार्गावर पुन्हा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अपघाताची मालिकाचा सुरू झाली. या अपघातासाठी वेगवेगळे तज्ज्ञाची मते जाणून घेतली जात आहेत. काहींच्या मते रस्ता बांधकामात दोष आहे तर काहींनी वेग मर्यादा यासाठी कारणिभूत सांगितली आहे. पण याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्लीत गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले. ते वाचा.
- राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करताना मार्गाच्या दुतर्फा ठराविक अंतरावर प्रसाधन आणि विसाव्याची व्यवस्था केली जाते. अपघात प्रवण स्थळ शोधून त्रुटी दूर केल्या जातात. नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गावर याचा अभाव दिसून येत आहे. हा राज्याचा प्रकल्प आहे. येथे केंद्राचा संबंध नसला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.
- गडकरी म्हणाले, “समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न करतात. हा महामार्ग बांधणारी ‘एमएसआरडीसी’ या संस्थेचा संस्थापक मीच आहे. या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १ जुलै २०२३ चालू घडामोडी
- ३० जुन २०२३ चालू घडामोडी
- २९ जुन २०२३ चालू घडामोडी
- २८ जुन २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |