९ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ ऑगस्ट चालू घडामोडी

सलग तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माची शानदार खेळी, गौतम गंभीरचा मोडला ‘हा’ विक्रम

  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सुरुवातीपासून वेस्ट इंडिज मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने ८३ तर तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी केली. तिलक वर्मा या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा पराक्रम केला आहे.
  • तिलक वर्माने तिसऱ्या टी-२० सामन्यात ३७ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये ३९, ५१ आणि ४९* धावा केल्या आहेत. यानंतर, तो भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या तीन डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गौतम गंभीरला मागे टाकले आहे. त्याचबरोबर संयुक्तपणे सूर्यकुमार यादवची बरोबरी करत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दीपक हुडा १७२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
  • सूर्यकुमार यादवनंतर तिलक वर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. ज्याने त्याच्या पहिल्या तीन डावातील प्रत्येक डावात 30 प्लस धावा केल्या आहेत. सूर्यानेही कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात १३९ धावा केल्या आहेत.

पहिल्या तीन डावात भारतासाठी सर्वाधिक T20I धावा करणारे फलंदाज –

  • १७२ धावा – दीपक हुडा
  • १३९ धावा – सूर्यकुमार यादव/तिलक वर्मा
  • १०९ धावा – गौतम गंभीर

वनविभाग पदभरतीलाही अखेर भ्रष्टाचाराचे ग्रहण‌? १९ लाखांचा दर, मोबाईल, बँकेचे चेक आणि….

  • राज्यात सुरू असलेल्या पदभरतीमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी रोज समोर येत आहेत. नोकरी लावण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून करिअर अकादमीच्या तीन संचालकांसह चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून फोर्ड कारसह सहा मोबाईल, विविध बँकेचे चेक आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
  • राज्यभरात सुरू असलेल्या वन विभागाच्या परीक्षेत मोबाईलवरुन आनलाईन उत्तरे देणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी पर्दापाश केला होता. या घटनेनंतर सातारा आणि जिन्सी पोलिसांनी देखील वनरक्षक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना सांगली-सातारा भागातील तीन ॲकडमी संचालक हे दलालांच्या मदतीने शहरात विद्यार्थी शोधत असल्याची माहिती मिळाली.
  • यावरुन पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून कारमध्ये आलेल्या सातारा खटाव मधील संत बाळुमामा अकादमी संचालक आण्णाजी धनाजी काकडे, मानसी अकादमीचे अनिल भरत कांबळे व नवस्वराज्य अकादमीचे संदीप भुतेकर यांच्यासह अकोला, आकोट मधील दलाल अमोल धनराज निचड या चार जणांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे देविदास नामदेव काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा

  • Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
  • राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा टप्पे कसे?

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : कोलंबियाची घोडदौड कायम; प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

  • कॅटलिन उस्मेच्या निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने मंगळवारी जमैकाचा १-० असा पराभव करून महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत कोलंबियासमोर युरोपीय विजेत्या आणि जेतेपदासाठी प्रमुख दावेदार इंग्लंडचे आव्हान असेल.
  • कोलंबियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत कोलंबियाने दक्षिण कोरिया आणि जर्मनी या संघांना नमवण्याची किमया साधली होती. दुसरीकडे जमैकाने फ्रान्स आणि ब्राझील यांसारखे संघ असलेल्या गटातून आगेकूच केली होती. त्यामुळे जमैकाला नमवण्यासाठी कोलंबियाला सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता आणि त्यात ते यशस्वी ठरले.
  • या सामन्यात दोन्ही संघांनी ५०-५० टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, याचा अधिक चांगला वापर कोलंबियाने केला. त्यांनी गोलच्या दिशेने ११ फटके मारले. युवा खेळाडू लिंडा कैसेडोला गोलच्या संधी मिळाल्या, पण तिला चेंडू गोलजाळय़ात मारण्यात अपयश आले. मात्र, ५२व्या मिनिटाला अ‍ॅना गुझमानच्या पासवर उस्मेने गोल नोंदवत कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला प्रथमच जमैकाविरुद्ध गोल करण्यात यश आले. यानंतर जमैकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोलंबियाचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यामुळे जमैकाचा पराभव झाला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

फ्रान्सची मोरोक्कोवर मात

  • फ्रान्सने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोवर ४-० अशी मात केली. विश्वचषकातील बाद फेरीत फ्रान्स महिला संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. फ्रान्सकडून ले सोमेरने (२३ व ७०व्या मिनिटाला) दोन, तर कादिदिआतू दियानी (१५व्या मि.) आणि केन्झा डाली (२०व्या मि.) यांनी एकेक गोल केला.

यंदाचा जुलै आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना! युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेची माहिती

  • यंदा जुलैने मागील सर्व उन्हाळय़ातील उष्णतेच्या उच्चांकाचे विक्रम मोडले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे, असे युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेने जाहीर केले. युरोपीयन महासंघाच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’ अवकाश मोहीम प्रकल्पाच्या शाखेने मंगळवारी जाहीर केले की जुलैत सरासरी जागतिक तापमान १६.९५ अंश (६२.५१ अंश फॅरेनहाइट) सेल्सिअस नोंदवले गेले. जे २०१९ मध्ये नोंदवलेल्या सर्वोच्च सरासरी तापमानापेक्षा एक तृतीयांश (०.३३) अंश सेल्सियसने जास्त (अंश फारेनहाइटचा सहा दशांश) आहे.
  • शास्त्रज्ञांनी सांगितले की जागतिक तापमानाचा विक्रम सर्वसामान्यपणे एका अंशाच्या १०० व्या ते दहाव्या भागाच्या फरकाने मोडले जातात, या तुलनेत हा फरक असामान्य आहे. ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’च्या उपसंचालिक समंथा बर्गेस यांनी सांगितले की, उष्णतेच्या या विक्रमामुळे मानवजीवन आणि ग्रह दोघांवरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे वारंवार हवामानात टोकाचे प्रतिकूल बदल घडतात.
  • अमेरिकेच्या नैऋत्य भागात आणि मेक्सिकोत उष्णतेची प्राणघातक लाट पसरली आहे. कोळसा, तेल आणि नैसर्गिक जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात हे टोकाचे बदल झाल्याचा ठपका शास्त्रज्ञांनी ठेवला आहे. २ जुलैपासून दिवसाचे कमाल तापमान पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात होते. तापमानातील फरक इतका मोठा होता की ‘कोपर्निकस’ आणि जागतिक हवामान संघटनेने जुलै महिन्याच्या अखेरीसच घोषित केले होते, की हा कदाचित आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना असू शकतो. त्याला आता अधिकृतपणे पुष्टी मिळाली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२३ मध्ये, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत सरासरी १.५ डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली.
  • ‘कोपर्निकस’ संस्थेने सांगितले, की जुलै महिना खूप उष्ण होता आणि जुलै २०२३ मध्ये जुलै १९९१ ते जुलै २०२० पर्यंतच्या सरासरी तापमानापेक्षा ०.७ अंश जास्त तापमान नोंदवले गेले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.