भारताचा ध्वज

भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

ब्रिटीश भारताचा ध्वज

ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

  • वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
  • मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
  • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
  • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र’ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

उंच राष्ट्रध्वज

  • भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटर) उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे.
  • पुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फूट (७२ मीटर) उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.
  • कोल्हापूर येथील ध्वज ८२ मीटर उंचीचा आहे.
  • पुण्यातील निगडी भक्ति-शक्ती उद्यानात २५-१२-२०१७ रोजी उभारलेला राष्ट्रध्वज १०७ मीटर उंचीचा आहे. या ध्वजाच्या कापडाची लांबी-रुंदी १२० गुणिले ९० फूट आहे.

Some contents are taken from Wikipedia.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *