अकोला हे मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील एक शहर आहे. हे विदर्भातील तिसरे मोठे शहर आहे
अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.
22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.
विभाग | अमरावती विभाग |
क्षेत्र | 5,431 km² |
तालुका | 7 अकोला अकोट तेल्हारा बालापूर बार्शीटाकळी मूर्तिजापूर पातूर |
किल्ले | नरनाळा किल्ला अकोला किल्ला बालापूर किल्ला |
प्रमुख नद्या | पूर्णा नदी उमा नदी काटेपूर्णा नदी शाहनूर नदी मोरणा नदी मून नदी मास नदी उतावळी नदी विश्वामित्री नदी निर्गुणा नदी गांधारी नदी आस नदी वाण नदी |
पर्यटन स्थळ | अकोला किल्ला नरनाळा किल्ला राज राजेश्वर मंदिर नरनाळा वन्यजीव अभयारण्य बलपूर किल्ला साला सर बालाजी टेम्पल |
प्रमुख पिके | गहू, चणा डाळ |
पिनकोड | 444001, 444002, 444003, 444004, 444005, 444006, 444104, 444109, 444302 |
आर टी ओ कोड | MH 30 |
महामार्ग | Asian Highway 46. NH 6 |
सीमा | उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. |
वेबसाईट | akola.gov.in/ |
अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.
- नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.
- मूर्तीजापूर – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
- पातुर – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
- पारस – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.
- अकोट – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.
- आडगाव – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
- हिवरखेड – आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
अकोला जिल्हयाची वैशिष्ट्ये
- मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.
- अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.
- अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)
- अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.
अकोला जिल्हा नकाशा
FAQs
अकोला जिल्ह्यात किती तालुके आहेत
7 – अट, बाळापूर, अकोला, तेल्हारा, अकोला टाककोपूरजा, पातुर, बारशीळी.