भंडारा जिल्हा (Bhandara District)
भंडारा जिल्हा (Bhandara District)

भंडारा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागात येतो.

भंडारा जिल्हा तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. भंडारा जिल्हा तांदुळाच्या जास्त उत्पादनासाठी ओळखला जातो.

भंडारा शहर मोठ्या पितळ उत्पादनांच्या उपस्थितीमुळे “ब्रास सिटी” म्हणून ओळखले जाते.

विभागनागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)
लोकसंख्या11,98,810 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
क्षेत्र3,716 किमी 2 एकूण (1,435 चौरस मैल)
प्रमुख नद्या:- वैनगंगा, सूर नदी 
प्रमुख पिके :- तांदूळ
भाषा :-मराठी
मुख्यालय:-भंडारा
तहसील / तालुके7: १. भंडारा, २.तुमसार, 3. पौनी आणि 4. मोहाडी, 5. साकोली, 6. लाखनी, 7. लखनदूर
प्रमुख महामार्ग :-NH53, NH247, NH353C.
पर्यटन स्थळे:- अम्बागड किल्ला, ब्राह्मी, चिंचगड आणि दिघोरी
पिनकोड 441904, भंडारा रोड :-441905, भंडारा टाउन :- 441904
 दूरध्वनी कोड 07184
आर टी ओ (RTO) कोड36
शेजारी जिल्हेभंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश असून पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा आणि पश्चिमेस नागपुर जिल्हा आहे.
वेबसाईट :- www.bhandara.gov.in
भंडारा जिल्हा (Bhandara District)

भंडारा जिल्हा विशेष:

भंडारा जिल्हा (Bhandara District)
भंडारा जिल्हा (Bhandara District)
  • भांड्याचे शहर म्हणून भंडारा अशी या शहाराच्या नावाशी उत्पती मांडली जाते. भाण हा शब्द भांडी या अर्थी वापरला जात असावा. असे अनुमान निघते.
  • भाण शब्दावरून भाणारा आणि त्यावरून पुढे भंडारा हा शब्द असावा. भात हे मुख्य पीक.
  • तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिध्द. येथील पितळी भांडी प्रसिध्द आहे.

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:

  • भंडारा – गवळी राजवटीत बाधलेला प्राचीन किल्ला शहरात आहे. पितळी भांडी प्रसिद्ध आहेत. येथे अलोनीबाबा या संताचा मठ आहे. भंडार्‍याचे निलभट्ट यांच्या घरी चक्रधर स्वामींनी मुक्काम केले आहे.
  • तुमसर – तांदळची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे मँगनीज शुध्द करण्याचा कारखाना आहे.
  • भंडारा रोड – येथे मोठा पोलाद प्रकल्प आहे.
  • जवाहरनगर – युध्द साहित्य निर्मितीचा मोठा कारखाना आहे.
  • अंबागड – येथील मध्ययुगीन किल्ला प्रसिध्द असून तो बख्त बुलंदशाह या गोंड राजाने बांधला आहे.
  • पवनी – हे स्थळ प्राचीन काळी बौध्द धर्मियांचे महत्वाचे क्षेत्र होते. येथे बौध्द कालीन स्तूप आहे.
  • अड्याळ – येथील हनुमान मंदिर प्रसिध्द आहे.

भंडारा जिल्हा नकाशा

भंडारा जिल्हा नकाशा
भंडारा जिल्हा नकाशा

FAQs

भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

7: १. भंडारा, २.तुमसार, 3. पौनी आणि 4. मोहाडी, 5. साकोली, 6. लाखनी, 7. लखनदूर