नागपूर विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागंपैकी एक असून नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ ह्या नावाने देखील ओळखला जातो.
त्याचप्रमाणे अमरावती आणि नागपूर विभाग मिळून विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग तयार होतो. नागपूर ही महाराष्ट्राची पूर्वेकडील एक बाजू असून प्रशासकीय मुख्यालय हे नागपूर शहरामध्ये आहे.
चतुः सीमा:
नागपूर विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग, पूर्वेस मध्य प्रदेश, उत्तरेस मध्य प्रदेश तर दक्षिणेस आंध्र
इतिहास:
नागपूर हा प्रशासकीय विभाग हा ब्रिटिशांनी १८६१ साली निर्माण केला होता. ब्रिटिशकालीन नागपूर विभागामध्ये बालाघाट जिल्हा त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यातील काही इतर भाग/जिल्हे देखील होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मध्य प्रांताचे रूपांतर मध्य प्रदेश राज्यामध्ये करण्यात तर १ नोवंबर १९५६ ला अमरावती आणि नागपूरला मुंबई प्रांतमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.
विभगा अंतर्गत येणारे जिल्हे: भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा
क्षेत्र:
५१,३३६ वर्ग किमी
साक्षरता:
७५.९०%
महाराष्ट्र जिल्हे (महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग)