नागपूर जिल्हा (Nagpur District)
नागपूर जिल्हा (Nagpur District)

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

Seal of nagpur city
Seal of nagpur city

सीमा – नागपुर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा, पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.

नागपूर जिल्हा (Nagpur District) Highlights
नागपूर जिल्हा (Nagpur District) Highlights
विभागनागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)
स्थापना1702 A.D
संस्थापकराजा बख्त बुलंद शा‍ह
जिल्ह्याचे मुख्य ठिकाणनागपुर
लोकसंख्या46,53,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
क्षेत्रशहर: 217.65 चौ किमी (84.04 sq mi)
मेट्रो: 3,780 चौ किमी (1,460 sq mi)
जिल्हा: 9,892 चौ किमी
समुद्र सपाटी पासुन उंची310 m (1,020 ft)
राजभाषामराठी
प्रमाण वेळIST (UTC+5:30)
पिन कोड440xxx
दूरध्वनी कोड91-712
आर टी ओ (RTO) कोडMH31 (नागपूर शहर पश्चीम )
MH49 (नागपूर शहर पूर्व )
MH40 (नागपूर मेट्रो )
तालुके15 – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.
जिल्ह्यातील मुख्य पीकेऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल,कापूस इ.
Official Websitehttps://www.nagpur.nic.in
नागपूर जिल्हा (Nagpur District)

नद्या:

नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे.

कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत येउन पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला मिळते. तिला लागूनच मौदा हे अतिशय महत्वाचा तालुका आहे, तसेच माथणी हे महत्वाचे गाव आहे.

जिल्ह्यातील तालुके:

 • नागपूर शहर
 • नागपूर ग्रामीण
 • कळमेश्वर
 • नरखेड
 • काटोल
 • पारशिवनी
 • रामटेक
 • हिंगणा
 • मौदा
 • कामठी
 • उमरेड
 • भिवापूर
 • कुही
 • सावनेर

नागपुर जिल्हा विशेष –

 • नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपुर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधांनीचे शहर होते. येशील दीक्षाभूमी हे स्थान प्रसिध्द आहे.
 • महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. संत्र्यासाठी देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा प्रसिध्द आहे.
 • 4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपुर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.
 • नागपुर विद्यापीठाचे नामकरण ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ’ असे करण्यात आले.

नागपुर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

 • नागपुर – महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डीचा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, निरी; रमन विज्ञान केंद्र प्रसिध्द आहे.
 • कामठी – दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगण पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे.
 • काटोल – येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे.
 • सावनेर – दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
 • रामटेक – येथेच महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहे.
 • अंभोरा – येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिध्द आहे.
 • कळमेश्वर – संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.
 • भिवापुर – मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

नागपुर जिल्ह्याची वैशिष्ट्ये –

 • 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय.
 • याच स्थळाला दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते.
 • कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रॅगण पॅलेस हे बौध्द धम्म मंदिराचे 23 नोव्हेंबर 1999 ला उद्घाटन झाले. अतिशय देखणी वास्तु असणारे हे मंदिर ड्रॅगण पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.

नागपूर जिल्हा नकाशा

नागपूर जिल्हा नकाशा
नागपूर जिल्हा नकाशा

FAQs

नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

15 – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.

Read More: