अमरावती जिल्हा (Amravati District)
अमरावती जिल्हा (Amravati District)

अमरावती जिल्हा हा मध्य भारतातील महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे. अमरावती हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

विभाग अमरावती 
मुख्यालय अमरावती 
क्षेत्र 12,235 km2 (4,724 sq mi)
भाषा मराठी 
आर टी ओ कोड MH-27
प्रमुख नद्या बुर्शी नदी सुखी नदी टिग्रीया नदी खंडू नदी खाप्रा नदी सांगिया नदी गाडागा नदी वान नदी वर्धा नदी विदर्भ नदी बोर नदी पाक नाला मारू नदी नरहा नदी चार्गर नदी शहानूर नदी
पर्यटन स्थळे 
प्रकल्प टायगरचे मेळघाट व्याघ्र प्रकल्प
चिखलदरा हिल स्टेशन
गुगरनल नॅशनल पार्क
वान वन्यजीव अभयारण्य
गविलगड किल्ला अंबादेवी मंदिर
मांजरखेड कसबा
सावंगा विठोबा, अवधूत महाराज मंदिर
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एचव्हीपीएम) संस्था
रुक्मिणीचे कौडन्यापूर जन्मस्थान, कुंडण्यपूर
शहानूर धरण, अंजनगाव सुरजी
सिंभोरा धरण, मोर्शी
भगवान शिव, मोर्शी आणि धार्मिक स्थळ स्वामी चक्रधर यांचे साल्बर्डी तीर्थस्थान
भगवान हनुमान-जी, वरुड यांचे वेधपूर तीर्थक्षेत्र
संत यशवंत महाराज, वरुड यांचे मुसलखेडा तीर्थक्षेत्र
कोठारा, परटवाडा येथील कुष्ठरोगी मिशन कम्युनिटी हॉस्पिटल
बहिरम फेरे डिसेंबर ते फेब्रुवारी, परातवाडा
धारखोरा धबधबा, परटवाडा
बकदरी धबधबा, परटवाडा
रिद्धपूर, महानुभाव पंथची काशी. * दत्ताजीरी आणि अष्टमहासिद्धी मंदिर, परातवाडा
हौद कटोरा, अचलपूर
चंद्रभागा धरण, परटवाडा
वझर धरण, परटवाडा
शाह दुल्हा अब्दुल रहमान गझी रहमतुल्लाह अलई दर्गा, अचलपूर
गायत्री मंदिर, परातवाडा
मुक्तागिरी मंदिर, परटवाडा
देवनाथ मठ, अंजनगाव सुरजी
एकवीरा मंदिर, मुरहा, अंजनगाव सुरजी
विठ्ठल मंदिर, अंजनगाव सुरजी
बेटल पानांची शेती, अंजनगाव सुरजी
संत गुलाब बाबा आश्रम, टाकरखेडा, अंजनगाव सुरजी
खानदेश्वर भगवान मंदिर, नांदगाव खांदेश्वर
खानदेश्वर मंदिर (नांदगाव खानदेश्वर येथील भगवान शिव यांचे हेमाडपंथी मंदिर)
चांगापूर (प्रसिद्ध हनुमान मंदिर)
वायगाव (गणेशपुराणात उल्लेखित प्रसिद्ध गणेश मंदिर)
रिन्मोचन (प्लिग्रीम)
भिलटेक (तीर्थयात्री)
प्रमुख पिके लाल हरभरा, गहू, हिरवी मिरची, ऊस, हिरव्या मिरच्या, संत्री, गोड चुना आणि सुपारी
पिनकोड 444601
दूरध्वनी कोड 0721
वेबसाईट https://amravati.gov.in/
तालुके14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.
सीमाअमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.
अमरावती जिल्हा

अमरावती जिल्हा विशेष –

  • अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.
  • अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.
  • अमरावती विधापिठाचे नामकरण ‘संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ’ असे करण्यात आले.

अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे

अमरावती जिल्हा (Amravati District)
अमरावती जिल्हा (Amravati District)
  • अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
  • चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.
  • परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
  • रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
  • शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
  • मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
  • ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
  • बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
  • कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
  • सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

अमरावती जिल्हयाची वैशिष्ट्ये

  • कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
  • वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते. ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
  • मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.
  • अमरावती जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या – तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर
  • अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती – अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.
  • ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.
  • अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.
  • अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.
  • अमरावती जिल्ह्यामध्ये  प्रमुख औधोगिक उत्पादने – तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.
  • अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – घुळे-कलकत्ता (6)
  • अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमाती – कोरकू व गोंड
  • अमरावत जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण – चिखलदरा

FAQs

अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत

14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.