वर्धा जिल्हा (Wardha District)
वर्धा जिल्हा (Wardha District)

वर्धा जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यात आहे.
हा जिल्हा नागपूर विभागाचा एक भाग आहे.
वर्धा शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा ही प्रमुख शहरे आहेत.

सीमा: वर्धा जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस नागपूर जिल्हा आहे. आग्नेयेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आणि पश्चिमेस अमरावती जिल्हा आहे.

वर्धा या शहराचे पूर्वीचे नाव पालकवाडी असे होते. पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबध्द विकास होऊन आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले आहे.

गांधी जिल्हा म्हणून ओळख.

महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.

महात्मा गांधी ज्या झोपडीत राहत होते ती झोपडी ‘बापू-कुटी’आजही सेवाग्राम येथे पहावयास मिळते.

पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम प्रासिद्ध आहे.

विभागनागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)
जिल्हा मुख्यालय वर्धा शहर 
लोकसंख्या12,96,157 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
क्षेत्र 6,310 km2 (2,440 sq mi)
लोकसभा सीट वर्धा 
विधानसभा वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट 
प्रमुख नद्या कृष्णा गोदावरी नर्मदा 
तहसील  / तालुके 8: आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा 
पिनकोड 442001
आर टी ओ कोडMH-32
पर्यटन स्थळे सेवाग्राम आश्रम 
बोर वाईल्ड लाईफ सेंचुरी 
गांधी आश्रम बापू कुटी 
विश्वा शांती स्तूपा 
महाकाली मंदिर 
बोरधरण डॅम 
गीताई मंदिर टेम्पल 
मगन संग्रहालय म्युसियम 
गांधी हिल 
परंधाम आश्रम 
लक्ष्मीनारायण टेम्पल
परमधाम आश्रम
गिरड दर्गा
बोर टायगर रिसर्व
वेबसाईट https://wardha.gov.in/en/
वर्धा जिल्हा (Wardha District)

वर्धा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

वर्धा जिल्हा (Wardha District)
वर्धा जिल्हा (Wardha District)
  • वर्धा – जवळच असलेले  सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींचा व पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम प्रासिद्ध आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय येथे आहे. वर्धा येथील अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ ही संस्था प्रसिध्द आहे.
  • हिंगण घाट – येथील जैन मंदिर व मल्हारी – मार्तंड मंदिर प्रसिध्द आहे.
  • आर्वी – येथील काचेचे जैन मंदिर प्रसिध्द आहे. आर्वीला संतांची आर्वी म्हणून ओळखतात.
  • आष्टी – 1942 च्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही मारल्या गेले.
  • पवनार – विनोबा भावेंनी स्थापन केलेला परमधाम आश्रम आहे.
  • सेवाग्राम – सेवाग्राम येथे ‘बापू-कुटी’ प्रसिध्द आहे.
  • पुलगाव – लष्करी सामग्रीचे कोठार यासाठी प्रसिध्द आहे.
  • केळझर – स्फोटक द्रवाचा कारखाना.
  • ढगा – हे गाव कारंजा तालुक्यात येत असून येथे शिवलिंग असलेली प्राचीन मंदिर आहे.

वर्धा जिल्हा नकाशा

वर्धा जिल्हा (Wardha District)
वर्धा जिल्हा (Wardha District)

FAQs

वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 8: आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा