सातारा जिल्हा / Sangli District
सातारा जिल्हा / Sangli District

सातारा जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे.

भीमा व कृष्णा नदीच्या पात्रात सातारा जिल्हा आहे.

सातारा जिल्हा / Sangli District

प्रशासकीय विभागपुणे विभाग 
मुख्यालय सातारा शहर 
क्षेत्र 10,484 km2 (4,048 sq mi)
भाषा मराठी 
महामार्ग NH -04
नगरपरिषद सातारा 
तहसील ११ 
प्रतापगड


सातारा
कराड
वाई
महाबळेश्वर
फलटण
माणूस
खटाव
कोरेगाव
पाटण
जावळी
खंडाळा
पंचायत समिती११ सातारा कराड वाई महाबळेश्वर फलटण माणूस खटाव कोरेगाव पाटण जावळी खंडाळा
नद्या कृष्णा नदी, कोयना नदी, वेण्णा नदी, नीरा नदी, सावित्री नदी, पंचगंगा नदी 
पिके  ज्वारी, पेरीमिलेट आणि शेंगदाणे
वेबसाईट www.satara.gov.in
तालुके11 – खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड.
सीमाउत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे.
महत्त्वाचे उद्योगधंदेसाखर कारखाने, काच कारखाना, ऑईल इंजिन कारखाना, औद्योगिक वसाहत
सातारा जिल्हा / Sangli District

सातारा जिल्हा विशेष:

  • रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.
  • येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला.
  • ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे.

सातारा जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना

सातारा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो. या जिल्ह्याचा प्राकृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ७४५ गावे, १ हजार ५०२ ग्रामपंचायती, ११ तालुके, ११ पंचायत समित्या, ८ नगरपालिका, ८ नगरपंचायती, ७ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्यात सातारा व माढा २ लोकसभा मतदार संघव ८ विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्याचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एमएच – ११ आहे.

संस्थासंख्यानावे
नगरपरिषदासातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, रहीमतपूर, पाचगणी, फलटण, म्हसवड
नगरपंचायतकोरेगाव, पाटण, मेढा, वडूज, दहिवडी, खंडाळा, लोणंद, मलकापूर
पंचायत समित्या११सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा
तालुके११सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा
महसूल उपविभागसातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, पाटण, माण-खटाव
सातारा जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना

सातारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

  • सातारा – सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये ‘अजिक्यतारा’ हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे.
  • महाबळेश्वर, पाचगणी – हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर.
  • वाई – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे.
  • पाटण – येथे ‘शिवाजीसागर’ हा जलाशय आहे.
  • कर्हाड – एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.
  • औंध – औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. या वस्तु संग्रहालयात ८ हजारांपेक्षा जास्त वस्तु आहेत.
  • प्रतापगड – महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.
  • चाफळ – छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.
  • सज्जनगड – स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास ‘सज्जनगड’ असे नाव देण्यात आले आहे.
  • म्हसवड – येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे.
  • माहुली – ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.
  • भिलार – वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून भिलार गावाची निवड केली आहे. असंख्य विषयांवरची पुस्तके गावातील घरांमध्ये उपलब्ध आहेत.
  • मसूर – ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.
  • निगडी – समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.
  • कासपठार: पावसाळ्यानंतर रानफुलांनी सजलेले कासपठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. यावेळी विविध रंगांच्या फुलांबरोबरच व विविध रंगांची फुलपाखरेही आढळून येतात. या स्थळास सन २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला आहे.
  • ठोसेघर : सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
  • पाली : कराड तालुक्यातील पाली येथे खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. येथील खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.

सातारा जिल्ह्यातील घाट

सातारा जिल्ह्यात खंबाटकी, कुंभार्ली, पसरणी इत्यादी प्रमुख घाट आहे.

  1. खंबाटकी घाट : पुणे-बंगळुर महामार्ग (खंडाळ्याजवळ),
  2. कुंभार्ली घाट : पाटण -चिपळून (कराडरत्नागिरी),
  3. पसरणी घाट : वाई-महाबळेश्वर,
  4. हातलोट घाट : बिरमणी (ता. खेड) – घोणसपूर (ता. महाबळेश्वर),
  5. पार घाट : महाबळेश्वर-महाड ,
  6. आंबेनळी घाट : महाबळेश्वर-महाड.

सातारा जिल्ह्यातील किल्ले

तालुकागड/किल्ले
जावळी व महाबळेश्वरप्रतापगड, वासोटा, मकरंदगड
वाई व खंडाळाकमळगड, वैराटगड, पांडवगड, केंजळगड
पाटणभैरवगड, सुंदरगड, गुरपावंतगड, जंगलीजयगड
कन्हाडसदाशिवगड, वसंतगड
सातारा व कोरेगावअजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी
फलटण व माणवारूगड, महिमानगड, संतोषगड
खटावभूषणगड, वर्धनगड
सातारा जिल्ह्यातील किल्ले

सातारा जिल्हा नकाशा

सातारा-जिल्हा-नकाशा Satara District
सातारा-जिल्हा-नकाशा Satara District
सातारा-जिल्हा-नकाशा Satara District
सातारा-जिल्हा-नकाशा Satara District

FAQs

सातारा जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग कोणता आहे?

पुणे विभाग

सातारा जिल्ह्याची अधिकृत भाषा कोणती आहे?

मराठी

दख्खनवर मुस्लिमांचे पहिले आक्रमण कोणत्या वर्षी झाले?

१२९६

सातारा मध्ये किती उपविभाग आहेत?

जाओली, कराड, खंडाळा, खटाव, कोरेगाव, महाबळेश्वर, माण, पाटण, फलटण, सातारा, वाई