यवतमाळ जिल्हा हा ध्वनीमुद्रण पूर्वी पूर्वी यवतमाळ म्हणून ओळखला जात असे, हा महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे.
हे राज्याच्या पूर्व-मध्य भागात विदर्भात आहे. नागपूर व अमरावतीनंतर हा लोकसंख्येनुसार विदर्भाचा तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे
यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यवतमाळ येथे आहे . जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत व यवतमाळ हे शहर डोंगरात वसलेले आहे . या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: कोरडे व विषम आहे. यवतमाळ या जिल्ह्यातील पैनगंगा या नदीवर सहस्त्रकुंड धबधबा प्रसिध्द आहे .
मुख्यालय | यवतमाळ |
विभाग | अमरावती विभाग |
तहसील | १.अर्णी, २.उमरखेड, ३. कळंब, ४ पंढरकवडा केळापूर, ५ घटंजी, 6..झारी जमानी, ७.दारवा , ८.दिग्रास, ९. नेर, १०.पुसद, ११.भाभुळगाव, १२.महागाव, 13. मारेगाव, 14. यवतमाळ, 15. राळेगाव 16.वणी |
क्षेत्र | 13,584 km2 (5,245 sq mi) |
महामार्ग | NH7 |
तहसील एस.टी.डी. कोड पिन कोड | यवतमाळ- 07232 -445001 बाभुळगाव -07203 -445101 आर्णी -07234 -445103 दारव्हा -07238 -445202 नेर -07238- 445102 पुसद- 07233- 445204 दिग्रस -07234- 445203 उमरखेड -07231 -445206 महागाव -07236 -445205 केलापूर -07235- 445302 जरी जमनी -07237- 445304 घंटंजी -07230 -445301 राळेगाव- 07202- 445402 कळंब- 07201- 445401 वणी -07239 -445304 मारेगाव -07237- 445303 |
प्रमुख नद्या | पैनगंगा, वर्धा नदी, आरणा नदी |
प्रमुख पिके | कापूस, ऊस, हळद, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कापूस, सोयाबीन आणि शेंगदाणे, गहू, हरभरा, ज्वारी आणि शेंगदाणे |
पर्यटन स्थळे | टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य सहस्त्रकुंड धबधबा |
वेबसाईट | https://yavatmal.gov.in/ |
तालुके | 16 – दारव्हा, यवतमाळ, पुसद, राळेगांव, वणी, बाभुळगांव, कळंब, मारेगांव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागांव, आर्णी, झरिजामाणी |
सीमा | उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला जिल्हा आहे. |
यवतमाळ जिल्हा विशेष
- यवतमाळ शहराचे नाव पूर्वी यवत किंवा यवते असे असावे. यवते चा महाल असा प्रत्यय लागून यवतमाळ हे नाव पडले असावे.
- महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे ‘पांढरे सोने पिकविणारा किंवा कापसाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.
- वर्धा व पैनगंगा या दोन नधा जिल्ह्याच्या प्रमुख नधा होत.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- यवतमाळ – प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
- वणी – येथील रंगनाथस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- पाटणबोरी – हे ठिकाण पांढरकवडा तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याचा उधोग येथे आहे.
- घाटंजी – मोरोली महाराजांच्या यात्रेकरिता प्रसिद्ध.
- कळंब – कलंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भारतातील 21 महत्वाच्या आणि पौराणिक आधार असलेल्या गणेश स्थानांमध्ये श्री चिंतामणीचा समावेश होतो.
यवतमाळ जिल्ह्याचीवैशिष्ट्ये –
- पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजाची काशी म्हणून उल्लेख होतो.
- जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गांव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबरच प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.
- किनवट अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे.
- टेपेश्वर राखीव मृगया क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे.
- यवतमाळ जिल्हयातून पैनगंगा नदी वाहते.
- यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – हैद्राबाद- जबलपुर (क्र.7)
- विदर्भामध्ये नागपुर व अमरावती ही दोन प्रशासकीय विभाग येते.
- नागपुर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे व अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे अशी एकूण 11 जिल्हे विदर्भात आहे.
- विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – गडचिरोली. (क्षेत्रफळ – 14,412 चौ.कि.मी.)
- विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – भंडारा. (क्षेत्रफळ – 3,895 चौ.कि.मी.)
- विदर्भातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – नागपूर.
- सहकारी तत्वावर विदर्भातील पहिला साखर कारखाना – जिजामाता सहकारी साखर कारखाना मर्यादित हा होय.
FAQs
16 – १.अर्णी, २.उमरखेड, ३. कळंब, ४ पंढरकवडा केळापूर, ५ घटंजी, 6..झारी जमानी, ७.दारवा , ८.दिग्रास, ९. नेर, १०.पुसद, ११.भाभुळगाव, १२.महागाव, 13. मारेगाव, 14. यवतमाळ, 15. राळेगाव 16.वणी
महाराष्ट्र जिल्हे (महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग)
# | विभाग | जिल्हे | चौ.किमी |
---|---|---|---|
1 | कोकण विभाग | मुंबई शहर – मुंबई उपनगर – ठाणे – पालघर – रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग | 30746 |
2 | नाशिक विभाग (खान्देश) | नाशिक – धुळे – नंदूरबार – जळगाव – अहमदनगर | 57442 |
3 | पुणे विभाग (प.महाराष्ट्र) | पुणे – सातारा – सांगली – सोलापूर – कोल्हापूर | 57268 |
4 | औरंगाबाद विभाग (मराठवाडा) | औरंगाबाद – जालना – परभणी – हिंगोली – बीड – नांदेड – उस्मानाबाद – लातूर | 64822 |
5 | अमरावती विभाग (प.विदर्भ) | अमरावती – बुलढाणा – अकोला – वाशिम – यवतमाळ | 46090 |
6 | नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ) | नागपूर – वर्धा – भंडारा – गोंदिया – चंद्रपूर – गडचिरोली | 51336 |