सोलापूर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. सोलापूर शहर हे जिल्हा मुख्यालय आहे. हे राज्याच्या दक्षिण पूर्वेकडील काठावर वसलेले आहे आणि संपूर्णपणे भीमा व सीना खोऱ्यात आहे.
इ स वी सन 1864 मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ स वी सन 1871 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इ स वी सन 1875 मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ स वी सन 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला.
प्रशासकीय विभाग | पुणे विभाग |
क्षेत्र | 14,845 km2 (5,732 sq mi) |
महामार्ग | 65,52,204,361,465,150E |
तहसील | उत्तर सोलापूर – हेड क्वार्टर सिटी सोलापूर दक्षिण सोलापूर – मुख्यालय शहर सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा सांगोला मोहोल माधा करमाळा माळशिरस |
गाव | 1144 |
पिनकोड | 413001 |
दूरध्वनी कोड | 0217 |
आर टी ओ कोड | MH-13 |
प्रमुख नद्या | भीमा नदी, भोगावती नदी, सीना नदी, नीरा नदी |
प्रमुख पिके | गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, हरभरा, ऊस, कापूस आणि भुईमूग |
वेबसाईट | https://solapur.gov.in/ |
तालुके | 11 – करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट. |
सीमा | उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे. |
सोलापूर जिल्हा विशेष –
- हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे.भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला.
- येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- सोलापूर – येथील चादरी ‘सोलापुरी चादर’ या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत.
- पंढरपूर – पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात.
- अक्कलकोट – स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर.
- करमाळे – येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे.
- बेगमपुर – ता. मोहळ – येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.
- ब्र्म्ह्पुरी – हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे.
- नान्नज – सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा ‘माळढोक’ या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे.
सोलापूरजिल्ह्याची वैशिष्ट्ये
- सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.
- चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय.
- सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.
- सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळी येथे आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत.
- सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).
- वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे.
- सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे.
- सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग.
- चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.
सोलापूर जिल्हा नकाशा
सोलापूर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?
सोलापूर जिल्ह्या 14,845 किमी ( 5,732 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?
जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार सोलापूरची एकूण लोकसंख्या 43,15,527 होती.
सोलापूर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?
सोलापूर मध्ये एकूण अकरा (11) विधानसभा मतदार संघ आहेत.
सोलापूर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?
सोलापूर मध्ये एकूण तीन (3) लोकसभा मतदारसंघ आहेत.
FAQs
सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत .
सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तहसील आहेत .