बुलढाणा जिल्हा (Buldhana District)
बुलढाणा जिल्हा (Buldhana District)

बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र, अमरावती विभागातील जिल्हा आहे. हे विदर्भातील पश्चिम सीमेवर वसलेले आहे आणि राज्याची राजधानी मुंबईपासून 500 कि.मी. अंतरावर आहे.

प्राचीन ‘कुंतल’ देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता. भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.

हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खार्‍या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

विभाग अमरावती विभाग 
क्षेत्र 9,640 km2 (3,720 sq mi)
मुख्यालय बुलढाणा शहर 
तालुके १. बुलढाणा,
२. चिखली,
३ देऊळगाव राजा,
४. खामगाव,
५. शेगाव,
६. मलकापूर,
७. मोताळा,
८. नंदुरा,
९. मेहकर,
१०. लोणार,
११. सिंदखेड राजा,
१२. जळगाव जामोद ,
13. संग्रामपूर
महामार्ग NH-753A
आर टी ओ कोड NH-6
पिनकोड बुलढाणा 443001
चिखली 443201
देऊळगाव राजा 443204
मेहकर 443301
लोणार 443302
सिंदखेड राजा 443203
खामगाव 444203
मलकापूर 443101
मोताला 443103
शेगाव 444203
नंदुरा 443404
जळगाव जामोद 443402
संग्रामपूर 444202
एस टी डी कोड 
1 बुलढाणा 7262
2 चिखली 7264
3 देऊळगाव राजा 7261
4 मेहकर 7268
5 लोणार 7260
6 सिंदखेड राजा 7269
7 खामगाव 7263
8 मलकापूर 7267
9 मोटाला 7267
10 शेगाव 7265
11 नंदुरा 7265
12 जळगाव जामोद 7266
13 संग्रामपूर 7266
प्रमुख नद्या तापी नदी , गोदावरी नदी , पूर्णा नदी , ‘नळगंगा नदी, पैनगंगा नदी 
प्रमुख पिके  तांदूळ, गहू, बाजरी, हरभरा, तूर, भुईमूग, केशर, ऊस, कापूस, मसाले 
पर्यटन स्थळे ओंकारेश्वर मंदिर मेहरूण तलाव
महात्मा गांधी गार्डन लँडोर खोरी गार्डन
इचापुर्ती गणेश मंदिर
जेसीएमसी भाऊंचे उद्यान राजमाता जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड  आनंद सागर शेगाव 
प्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिर  लोणार लेक 
सीमाबुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.
वेबसाईट https://buldhana.nic.in/
बुलढाणा जिल्हा (Buldhana District)

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे: 

बुलढाणा जिल्हा (Buldhana District)
बुलढाणा जिल्हा (Buldhana District)
  • बुलढाणा – हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
  • खामगाव – येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
  • मलकापुर – येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
  • देऊळगाव राजा – देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.
  • शेगांव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
  • सिंदखेड-राजा – छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
  • जामोद – जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
  • लोणार – उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.

बुलढाणा जिल्हयाची वैशिष्ट्ये:

  • राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
  • लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा, बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.
  • बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड, यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव (ब्रोंडगेज), 46 कि.मी.  

बुलढाणा जिल्हा नकाशा

बुलढाणा जिल्हा नकाशा
बुलढाणा जिल्हा नकाशा

FAQs

बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

13 – जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.