पुणे हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. पुणे शहर मध्य जिल्हा मुख्यालय आहे.
विभाग | पुणे विभाग |
मुख्यालय | पुणे |
क्षेत्र | 15,642 km2 (6,039 sq mi) |
महामार्ग | NH-48, NH-65, NH-60 |
भाषा | मराठी |
दूरध्वनी कोड | तहसील पुणे शहर 020 तहसील हवेली 020 तहसील पिंपरी-चिंचवड 020 तहसील मावळ 02114 तहसील मुळशी 020,02139 तहसील शिरूर 02138 तहसीलदार भोर 02113 तहसील पुरंदर 02115 तहसील वेल्हा 02130 तहसील आंबेगाव 02133 तहसील दौंड 02117 तहसील बारामती 02112 तहसील इंदापूर 02111 तहसील जुन्नर 02132 तहसील खेड 02135 |
पिन कोड | तहसील पुणे शहर 411001,411002 तहसील हवेली 411021,411023 तहसील पिंपरी-चिंचवड 411044 तहसील मावळ 410506 तहसील मुळशी 412115 तहसील शिरूर 412210 तहसीलदार भोर 412206 तहसील पुरंदर 412305 तहसील वेल्हा 412212 तहसील आंबेगाव 410503 तहसील दौंड 413801 तहसील बारामती 413102 तहसील इंदापूर 413106 तहसील जुन्नर 410502 तहसील खेड 410501 |
मुन्सिपाल कॉर्पोरेशन | पुणे मुनसिपाल कॉर्पोरेशन पिंपरी चिंचवड मुंशीपाल कॉर्पोरेशन |
तहसील | हवेली पुणे शहर मावळ मुळशी शिरूर बारामती दौंड इंदापूर भोर वेल्हा पुरंदर खेड जुन्नर आंबेगाव |
नद्या | मुळा मुठा नदी भीमा नदी मुळा नदी पवना नदी रामनदी नीरा नदी कर्हा नदी घोड नदी |
प्रमुख पिके | जवारी, बाजरी, तांदूळ, गहू |
पर्यटन स्थळे | लोणावळा-खंडाळा सिंहगड अगाखान पॅलेस शनिवार वाडा शिवनेरी किल्ला खडकवासला धरण सरसबाग-पेशवे पार्क लाल महाल कसबा गणपती चतुर्शृंगी मंदिर पार्वती भीमाशंकर जेजुरी अष्टविनायक देहू आळंदी नीरा नरसिंहपूर |
सीमा | उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. |
वेबसाईट | pune.gov.in |
पुणे जिल्हा विशेष
- ‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.
- राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.
- देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.
पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे
- पुणे मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.
- पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.
- जुन्नर जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.
- आळंदी हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.
- देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
- चाकण येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.
- लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.
- जेजूरी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.
- आर्वी आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
- राजगुरूनगर हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.
- भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.
- उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.
- दौंड दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.
- वालचंदनगर येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.
- सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
- भोर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.
- वेल्हे हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.
- वढू येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
- पौंड हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.
पुणे जिल्हयाची वैशिष्ट्ये
- पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.
- 1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.
- ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.
- पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.
- राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)
- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे
- राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
- राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे
- भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे)
- महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे
- सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला
- फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे
- नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)
पुणे जिल्हा नकाशा
FAQs
पुणे जिल्ह्याची राजभाषा कोणती आहे?
मराठी
पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?
14: जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.