सांगली जिल्हा / Sangli District
सांगली जिल्हा / Sangli District

सांगली हे एक शहर आणि पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय आहे. हे मसाल्याचे उत्पादन व व्यापार केल्यामुळे हे महाराष्ट्रातील हळदी शहर म्हणून ओळखले जाते. सांगली कृष्णा नदीच्या काठावर वसली आहे आणि त्यात अनेक साखर कारखाने आहेत.

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. 

ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यातल्यात्यात तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत.

याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत -तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

स्थापना हरभट परवर्धन 
स्थापना दिन२१ नोव्हेंबर १९६०
क्षेत्र  8,578 Square Kilometer
विभाग पुणे विभाग 
उप विभाग 

मिरज
जाट
विटा-खानापूर
कडेगाव
वाळवा
 तहसील  १० 


मिरज
तासगाव
कवठे महांकाळ
जाट
विटा
आटपाडी
कडेगाव
पलूस
वाळवा
शिराळा
 भाषा मराठी 
पिनकोड 416416
 एस टी डी कोड  +91-233
आर टी ओ कोड  MH-10, MH-60
 नद्या कृष्णानदी , वारणा नदी, कोयना नदी, मान नदी, वैना नदी
महामार्ग NH-4‎, ‎NH-204
पिके बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू, मका, ऊस, मुंगफल्ली, शेंगदाणा, हळद, सोयाबीन, अंगूर, डाळिंब, कापूस 
पर्यटन स्थळे श्री. दत्ता मंदिर, औदुंबर
दंडोबा – भोसे
मीरासाहेब दर्गा, मिरज

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
वेबसाईट sangli.nic.in
तालुके10 – खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव.
सीमाउत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.

सांगली जिल्हा विशेष –

  • 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले.
  • सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात.
  • हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात ‘शाळू’ म्हणून ओळखले जाते.
जिल्ह्यात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांचा हंगामनिहाय तपशील पुढील रकान्यात दिला आहे –
अं.क्र.हंगामप्रमुख पिके
१.खरीपतांदूळ, ज्वारी, तंबाखू
२.रब्बीगहू, हरभरा
३.खरीप व रब्बीज्वारी, ऊस
सांगली जिल्ह्यात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांचा हंगामनिहाय तपशील पुढील रकान्यात दिला आहे

सांगली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

  • सांगली – शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे.
  • मिरज – येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे.
  • औंदुबर – या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे.
  • बहादूरवाडी – या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला.
  • बेडग – ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
  • भोपाळगड – ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता.
  • भोसे – येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे.
  • देवराष्ट्र – हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे.
  • कासबे दिग्रज – मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे.
  • कुंडल – तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे.
  • शिराळा – या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात.
  • मच्छिंद्रगड – कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.

राजकीय संरचना

१. लोकसभा मतदारसंघ :

लोकसभा मतदार संघात सांगली, मिरज, पलूस-कडेगांव, खानापूर-आटपाडी ,तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे ६ मतदारसंघ आहेत. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.

२. विधानसभा मतदारसंघ :

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत-मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.

सांगली जिल्हा नकाशा

सांगली जिल्हा नकाशा
सांगली जिल्हा नकाशा

FAQs

सांगली शहराचे संस्थापक कोण आहेत?

हरभत पटवर्धन

सांगली कोणत्या प्रकारचे शहर आहे?

महानगरपालिका

सांगली जिल्ह्याची राजभाषा कोणती आहे?

मराठी

कोणता जिल्हा सहकारपंढरी म्हणून ओळखला जातो?

सांगली.

सांगलीमध्ये किती उपविभाग आहेत?

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, पलूस, शिराळा, तासगाव, वाळवा