कोल्हापूर जिल्हा / Kolhapur District
कोल्हापूर जिल्हा / Kolhapur District

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात आहे.

हे शहर कोल्हापूर SAAJ (पारंपारिक पॅटर्नसह हार), गुळ, कोल्हापूर चप्पल (पारंपारिक चामड्याचे चप्पल) आणि कुस्ती या नावाने प्रसिद्ध आहे. कोल्हापूर हे नॉन-वेज फूड रेसिपी (मराठी: कोल्हापुरी पंढरा रस, तांबडा रस) आणि अनन्य मसाले यासाठी प्रसिद्ध आहे.

मुख्यालय कोल्हापूर शहर 
प्रशासकीय विभाग पुणे विभाग 
क्षेत्र 7,685 km2 (2,967 sq mi)
महामार्ग NH-4, NH-204
भाषा मराठी 
तहसील शाहूवाडी पन्हाळा हातकणंगले शिरोल करवीर गगनबावडा राधानगरी कागल भुदरगड अजारा गडहिंग्लज चंदगड
प्रमुख नद्या पंचगंगा , कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती 
प्रमुख पिके तांदूळ, ऊस 
पिनकोड शाहूवाडी – 416215 पन्हाळा- 416201 हातकणंगले – 416115 शिरोल – 416103 करवीर – 416003 गगनबावडा – 416206 राधानगरी – 416212 कागल – 416216 भुदरगड – 416209 अजारा – 416505 गडहिंग्लज – 416502 चंदगड – 416509
दूरध्वनी कोड शाहूवाडी – 02329 पन्हाळा – 02328 हातकणंगले – 0230 शिरोल – 02322 करवीर – 0231 गगनबावडा – 02326 राधानगरी – 02321 कागल – 02325 भुदरगड – 02324 अजारा – 02323 गडहिंग्लज –  02327 चंदगड – 02320
पर्यटन स्थळे श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर.
टेंबलाबाई मंदिर, कोल्हापूर
भवानी मंडप, कोल्हापूर
नवीन पॅलेस संग्रहालय, कोल्हापूर
ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर.
रंकाळा तलाव, कोल्हापूर. 
कोपेश्वर मंदिर, कोल्हापूर.
विशालगड, कोल्हापूर.
वेबसाईट https://kolhapur.gov.in/
तालुके12 तालुके: शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.
सीमाउत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्हे आहे.

कोल्हापूर जिल्हा विशेष:

  • पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास ‘करवीर’ असे नाव पडले. दुसर्‍या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर ‘कोल्हासूर’ नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले.
  • हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत.
  • गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

  • कोल्हापूर – महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. ‘कुस्तीगिरांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. ‘खासबाग’ हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते.
  • पन्हाळा – पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे.
  • राधानगर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
  • बाहुबली – हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
  • आजरा – (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.
  • आळते – (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा.
  • इचलकरंजी – (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत.
  • कणेरी – (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे.पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो.
  • बालिंगे – (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.
  • ज्योतिबा – (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते.
  • वडगाव – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे.
  • नरसिंहांची वाडी – यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध.
  • हुपरी – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.  
  • कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.
  • हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात.
  • कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत.
  • कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात.
  • कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत.
  • पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे.
  • विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे.
  • सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे.
  • राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे.
  • राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात.
  • शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे.
  • कोल्हापूरला खासबाग मैदान आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.
  • शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे.
  • कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे.
  • कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.

FAQs

महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे?

कोल्हापूर

कोल्हापूर शहर कोणत्या प्रकारचे आहे?

एकोणीस तोफांची सलामी रियासत

देवी गीतेच्या कोणत्या अध्यायात कोल्हापूर शहराचा उल्लेख आहे?

देवी-भागवत पुराण

कोल्हापूर शहराचे शहर कोणत्या प्रकारचे आहे?

महानगरपालिका

कोल्हापूरची अधिकृत भाषा कोणती आहे?

मराठी

कोल्हापूर शहराचा टेलिफोन कोड काय आहे?

०२३१

कोल्हापूर शहराचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे?

MH-09

कोल्हापूर शहरात कोणती फ्लिम कंपनी स्थापन झाली?

महाराष्ट्र फिल्म कंपनी

कोल्हापुरात कोणते विद्यापीठ आहे?

शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर जिल्ह्याचे छोटे नाव काय आहे?

KO