कोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.

क्षेत्रफल:३०,७४६ किमी वर्ग
लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (२००१ ची जनगणना)
जिल्हे:मुंबई शहर मुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदूर्ग
साक्षरता: ८१.३६%

इतिहास

ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. 
 ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते.
 १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. 
१९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली.
कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले 
२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.

चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.

कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

महाराष्ट्र जिल्हे (महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग)

#विभागजिल्हेचौ.किमी
1कोकण विभागमुंबई शहर मुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदूर्ग30746
2नाशिक विभाग (खान्देश)नाशिकधुळेनंदूरबारजळगावअहमदनगर57442
3पुणे विभाग (प.महाराष्ट्र)पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूर57268
4औरंगाबाद विभाग (मराठवाडा)औरंगाबादजालनापरभणीहिंगोलीबीडनांदेडउस्मानाबादलातूर64822
5अमरावती विभाग (प.विदर्भ)अमरावतीबुलढाणाअकोलावाशिमयवतमाळ46090
6नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)नागपूरवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली51336
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग: