गडचिरोली जिल्ह्याची स्थापना चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 झाली. बांबू आणि तेंदू पानांसाठी गडचिरोली खूप प्रसिद्ध आहे.
सीमा: गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा व पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. दक्षिणेस आंध्रप्रदेश आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
विभाग | नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ) |
स्थापना | 1982 |
मुख्यालय | गडचिरोली |
क्षेत्र | 14,412 km2 (5,565 sq mi) |
लोकसंख्या | 10,71,795 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) |
भाषा | मराठी |
पिनकोड | 442605 |
दूरध्वनी कोड | 07132 |
आर टी ओ कोड | MH-33 |
वेबसाईट | gadchiroli.gov.in |
प्रमुख पिके | ज्वार, तूर, मुंग, मका, भात |
तालुके | 12 – कुरखेडा, अहेरी, धानोरा, सिरोंचा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली, भामरागड, मुलचेरा, देसाईगंज. |
प्रमुख नदी | गाढवी, खोब्रागडी, पाल वेलोचना, काढणी, सिवाणी, पोर, दर्शनी, गोदावरी |
पर्यटन स्थळ | चपराला वाईल्ड लाईफ सेंचुरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा वडाधाम फॉसिल्स पार्क ग्लोरी ऑफ आलापल्ली मार्कंडा देव टेम्पल दीना इर्रीगेशन प्रोजेक्ट |
ग्रामपंचायत | 457 |
नगरपंचायत | 10 Nagar Panchayatis आरमोरी कुरखेडा कोरची धानोरा चामोर्शी मुलचेरा अहेरी एटापल्ली सिरोंचा भामरागड (Armori, Kurkheda, Korchi, Dhanora, Chamorshi, Mulchera, Aheri, Etapalli, Sironcha, Bhamragad) |
महामार्ग | NH 63, NH 353C, NH 353D, NH 542 & NH 930 |
गडचिरोली जिल्हा विशेष:
- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून 26 ऑगस्ट 1982 रोजी हा जिल्हा अस्तित्वात आला.
- गडचिरोली हा आदिवासी जिल्हा व नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंड ही येथील प्रमुख
- आदिवासी जमात होय. या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता व साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.
- राज्यातील ओद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून गडचीरोलीला ओळखले जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:
- हेमलकसा- अपंग व कुष्टरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनाकरिता बाबा आमटे व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांनी एक प्रकल्प सुरु केला आहे.
- सिरोंचा – येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी यात्रा भरते.
- आरमोरी – या गावात त्रिदल पध्दतीचे शैव मंदिर आहे. हे मंदिर गोंड राजा हरीश्र्चंद्राने बांधले जो वैरागडचा किल्लेदार होता. नंतर हा भाग रघुजी भोसलेच्या ताब्यात गेला.
- शोधग्राम – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे येथे आरोग्य केंद्र आहे.
- वैरागड – खोब्रागडी व सातनाला नद्यांच्या संगमावर आरमोरी तालुक्यात हा प्रसिध्द किल्ला आहे. विराट राजाची ही राजधानी . हा किल्ला राजा बाबाजी बल्लार शहा याने 1572 मध्ये बांधला असे मानतात.
गडचिरोली जिल्हा नकाशा
FAQs
गडचिरोली जिल्ह्यात किती तालुके आहेत?
12 – कुरखेडा, अहेरी, धानोरा, सिरोंचा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली, भामरागड, मुलचेरा, देसाईगंज.