चंद्रपूर जिल्हा पूर्ण भारतात सगळ्यात मोठा जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे. चंद्रपूर विदर्भ भागात येतो.
चंद्रपूर जिल्हा सुपर थर्मल पॉवर स्टेशन आणि वर्धा व्हॅली कोलफील्डमधील कोळशाच्या अफाट साठ्यासाठी प्रसिध्द आहे.
जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा भारतातील अठ्ठावीस प्रकल्पांच्या व्याघ्र प्रकल्पातील एक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाची मोठ्या प्रमाणात साठा आहे.
विभाग | नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ) |
मुख्यालय | चंद्रपूर शहर |
क्षेत्र | 11,443 km2 (4,418 sq mi) |
लोकसंख्या | 21,94,162 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) |
विधानसभा सीट | ६ |
तहसील / तालुके | १५ चंद्रपूर भद्रावती वरोरा चिमूर नागभीड ब्रह्मपुरी सिंदेवाही मूल साऊली गोंडपिंपरी राजुरा कोरपना पोंभूर्णा बल्लारपूर जिवती |
महामार्ग | NH 353E, NH 930, MSH 6, MSH 9, SH 233, SH 243, SH 264 |
प्रसिध्द ठिकाणे | ताडोबा अंधारी टायगर रिसर्व इरई डॅम चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर फेरो अॅलोय प्लांट बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड |
पर्यटन स्थळे | ताडोबा राष्ट्रीय उद्यान घोडाझरी तलाव अंकलेश्वर मंदिर श्री महाकाली मंदिर भद्रावती जैन मंदिर |
पिनकोड | 442401 |
आर टी ओ कोड | MH 34 |
प्रमुख नदी | अंधारी नदी, वर्धा नदी |
सीमा | चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा व नागपुर हे जिल्हे व पूर्वेस गडचिरोली जिल्हा आहे. दक्षिणेस आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्हा आणि पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, वायव्येस वर्धा जिल्हा आहे. |
चंद्रपूर जिल्हा विशेष:
- गोंड राजे व ब्रिटिश राजवटीत तसेच स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष हा जिल्हा चांदा नावाने ओळखला जात होता. पुढे त्याचे नवा चंद्रपुर असे झाले.
- चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक सीमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून गणला जातो. येथे राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प आहे.
- या जिल्ह्यातील कोळसा, सीमेंट व बल्लापूर येथील पेपर मिल प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:
- चंद्रपूर – गोंड राज्याची राजधानी. चंद्र्पुरातील महाकालीचे मंदिर व गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे.
- बल्लारपूर – औष्णिक विधुत निर्मिती केंद्र आहे. दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
- भद्रावती – युद्धसाहित्यनिर्मितीच्या कारखान्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील विजासन टेकडीवर बोद्धकालीन लेणी आहेत. जवळच ताडोबा राष्ट्रीय उधान आहे.
- वरोरा – बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प येथे आहे.
- मूल – धानाच्या किंवा भाताच्या गिरण्यांकरीत्या प्रसिद्ध.
- सोमनाथ – निसर्गरम्य ठिकाण, रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांची वसाहत व श्रमसंस्कार शिबीरे यासाठी प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्हा नकाशा
FAQs
चंद्रपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?
15 – गोंडपिंपरी, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपुर, राजुरा, चिमुर, नागभीड, मूल, जिवती, बल्लारपूर, पोंभूर्णा, सावली, कोपरना.