Brahmo-Samaj
Brahmo-Samaj

राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली

ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे:

  • हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.
  • समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.
  • ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.
  • हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.

ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान

एकेश्वरवाद : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.

मूर्तीपूजेस विरोध : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.

बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.

अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.

आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.

सर्व धर्मातील ऐक्य : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.

विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.

प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

ब्राह्मो समाजाची वैशिष्ट्ये:

एकेश्वर वादावर भर,
मूर्तीपूजेला विरोध,
वेदप्रणीत हिंदू धर्मावर निष्ठा

राजा राममोहन रॉय यांच्यानंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी संभाळली.
त्यांनी १८३८ साली ब्राम्हो समाजात प्रवेश केला व
केशवचंद्र सेन यांनी १८५७ मध्ये सदस्यत्व पत्करले. परंतु या दोघांच्यात वैचारिक मतभेद होता.

देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील आदि ब्राम्हो समाजचे कार्य मुख्यत्वे करुन धार्मिक सेवांपुरतेच मर्यादित होते,

तर केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखालील नूतन किंवा ब्राम्हो समाजाने समाजसुधारनेसारख्या व्यापक क्षेत्रातही आपले कार्य चालू ठेवले

केशवचंद्र सेन यांनी ‘सुलभ समाचार’ या सप्ताहिकद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला.

नूतन ब्राम्हो समाजाने, स्त्रियांनाही ब्राम्हो समाजात स्थान दिले. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी ‘विक्टोरिया इंस्टीट्यूट’ व ‘नॉर्मल स्कुल’ या संस्थांचीही स्थापना केली.

तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी तंत्रनिकेतनही सुरु केले

मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्षे ठरविणारा ‘दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज एक्ट’ १८७२ साली पास झाला.

त्यामागे केशवचंद्र सेन यांचा मोलाचा वाटा होता.

परन्तु १४ वर्षे पूर्ण न झालेल्या आपल्या मुलीचा विवाह त्यांनी कुचबिहाराच्या राजाशी १८७८ साली घडवून आणला. त्यामुळे नव ब्राम्हो समाजातील काही मंडळींनी त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आणि

त्यातूनच पुढे ‘साधारण ब्राम्हो समाज’ या वेगळ्या संस्थेची स्थापना झाली. या दुहीमुळे ब्राम्हो समाजाचा प्रभाव कमी होऊन त्यांचे कार्य मंदावले

देवेद्रनाथ टागोरांचे कार्य

राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजाला नवचैतन्य देण्याचे कार्य देवेंद्रनाथ टागोरांनी केले.

त्यांनी ब्राह्मो समाजात १८३८ मध्ये प्रवेश केला.

इ. स. १८३८ साली त्यांनी तत्त्वबोंधिनी सभा स्थापन केली.

केशवचंद्र सेन

केशवचंद्र सेन यांच्या कार्यपद्धतीमुळे ब्राह्मो समाजास नवी दिशा मिळाली.

त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रसार उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास प्रांतात केला.

केशवचंद्रांनी आंतरजातीय व विधवा विवाहाचा पुरस्कार केला.

ब्राह्मो समाजात फूट

देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले.
केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.

देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज आदि ब्राह्मो समाज या नावाने कार्य करू लागला.

इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण ब्राह्मो समाजात फूट पडली .

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. It is very important note that can be to use mpsc preperation as well as any competative examination.thanks jay hind???????

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *