भारताचे हवामान ‘मान्सून’ प्रकारात मोड़ते. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तवार जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान अधिक असते.

सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते.

उन्हाळ्यात राजस्थानातील गंगानगर भागात (५० डिग्री हून अधिक) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते.

हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालयीन पर्वत क्षेत्र या भागातील तापमान उणे ४० डिग्री इतके खली उतरते.

भारतीय ऋतु: भारतात ऋतुची विभागणी खालीलप्रमाणे:

उष्ण हवेचा उन्हाळा –मार्च ते मे
दमट व उष्ण पावसाळी ऋतु –जून ते सप्टेंबर
माघारी मान्सूनचा काळ – ऑक्टोंबर ते नोव्हेंबर
ठंड व कोरडा हिवाळा – डिसेंबर ते फेब्रुवारी

१ – उन्हाळा: मार्च ते मे 

२१ मार्च रोजी सूर्यकिरणे विषुवृत्तावर लंबरूप पडतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते
भारतात या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते व उन्हाळा सुरु होतो, परिणाम – लू वारे, धुळीची वादळे, नॉर्वेस्टर, कालबैसाखी
लू वारे – उन्हाळ्यात उत्तर भागात वाहणारे अति उष्ण वारे म्हणजे लू वारे
नॉर्वेस्टर – पश्चिम बंगाल, ओरिसा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार बाष्पयुक्त वारे व वायव्येकडून येणारे उष्ण कोरडे वारे यांच्या मिलनातून गडगडाटी वादळांची निर्मिती होते, त्यास नॉर्वेस्टर म्हणतात
कालबैसाखी – पश्चिम बंगालमध्ये अशा वादळांना (नॉर्वेस्टर) कालबैसाखी म्हणतात
आंबेसरी – उन्हाळ्यात निर्माण होनारया कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु या राज्यांत पडणारा पाउस म्हणजे आंबेसरी
वसंत वर्षा – पश्चिम बंगाल, आसाममध्ये या पावसास आंबेसरी म्हणतात

२ – पावसाळा: जून ते सप्टेंबर 

हिंदी महासागरावरून वाहणार्या बाष्पयुक्त नैऋत्य मौसमी वरयांमुळे भारतात पाउस पडतो
भारतात प्रवेश करताना नैऋत्य मौसमी वारयांचे अरबी समुद्रावरून वाहणारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे असे दोन प्रकार पडतात
हे वारे भारतात ८० टक्के हून अधिक पाउस देतात

३ – माघारी मान्सून काळ: ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 

२३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरु होते आणि उत्तर गोलर्धात् तापमान कमी होऊन वायुदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैऋत्य मौसमी वरयांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे सर्कु लागतात. यालाच मान्सूनची माघार असे म्हणतात

४ – हिवाळा: डिसेंबर ते फेब्रुवारी

२२ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर असतो, त्यावेळी भारतात तापमान कक्षा खाली येऊन कोरडा व थंड हिवाळा सुरु होतो
या काळात ‘ईशान्य मौसमी वारे’ बंगालच्या उपसागरावरून वाहताना बाष्पयुक्त बनतात
ईशान्य मौसमी वारयांमुळे पूर्व किनर्यावर आंध्रप्रदेश, तमिलनाडु येथे हिवाळ्यात पाउस पडतो

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.