भारतीय कर रचनेमध्ये करांचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.
केंद्राचे महत्त्वाचे कर – प्राप्तिकर, कस्टम डयुटी , केंद्रीय अबकारी कर. केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल हा अबकारी कर या अप्रत्यक्ष करापासून मिळतो

केंद्र शासनाचे प्रत्यक्ष कर:

प्राप्ती कर, कार्पोरेशन कर, संपत्ती कर, देणगी कर, इस्टेट डयुटी प्राप्तिकर व् कार्पोरेशन कर यांचा ‘उत्पन्न करात’ समावेश होतो


देणगी कराचा संपत्ती करात समावेश होतो


कार्पोरेशन करास ‘महामंडळ कर’ किंवा ‘कंपनी कर’ असे म्हटले जाते.


१ – प्राप्तिकर:
प्रत्य्क्ष कर
लवचिक व प्रगतशील कर
प्राप्तिकरतील कही उत्पन्न केंद्राकडून राज्यांना दिले जाते


२ – कार्पोरेशन कर:

केंद्राचा महत्त्वाचा प्रत्यक्ष कर
मोठया कंपन्यांना नफ्यावर आकारला जातो
कार्पोरेशन करातील वाटा केंद्राकडून राज्यांना कधीच दिला जात नाही


३ – संपत्ती कर व देणगी कर:
उत्पन्न व संपत्ति यावर केंद्र शासन कर बसविते
केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कर: अबकारी कर, जकात कर

१ – अबकारी कर:
यालाच केंद्रीय उत्पादन कर असेही म्हणतात
देशात उत्पादन होनारया सर्व वस्तूंवर हा कर आकारला जातो
महत्त्वाचे – दारुसारखी अल्कोहोलयुक्त मादक पेये व अफू, गांजा यासारख्या गुंगी आणणार्या पदार्थांवर अबकारी कर आकरण्याचे अधिकार राज्यांना आहेत
दारु, अफू, गांजा ही मादक पेये वगळता इतर सर्व देशाअंतर्गत वस्तूंच्या उत्पादनावर अबकारी कर आकारण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत


२ – जकात कर:
केंद्राचा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर
आयात-निर्यात मालावरील करांचा जकात करात समावेश होतो
यातील उत्पन्न राज्यांना दिले जात नाही

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.