जसजशी मानवी संस्कृती प्रगत होत जाते, तसतसे त्या-त्या समाजाचे राहणीमान बदलत जाते. या बदलत्या राहणी मानाचा दृश्य परिणाम म्हणजे वास्तुकलेचे बदलते स्वरुप होय. महाराष्ट्रात प्राचीन बौद्ध कालीन, हिंदू राजकालीन, मध्ययुगीन इस्लामिक, महादेव कोळी या जमातीची, १७-१८ व्य शतकातील मराठेकालीन, ब्रिटिशकालीन व आधुनिक भारतीय या सर्व शैलींची वास्तुशिल्पे आढळतात

लेणी

जगभरात असलेल्या सर्व लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळची लेणी सर्वात सुंदर मानली जातात.

ही लेणी राष्ट्रकुटांच्या काळात निर्माण करण्यात आली. अजिंठा येथील लेण्यांमध्ये बैद्ध जीवनातील व जातक कथांतील चित्रांद्वारे कहाण्या सांगण्यात आल्या आहेत.

वेरूळ येथील लेण्यात हिंदू, जैन, बैद्ध मंदिरे आहेत. ‘पितळखोरा’ येथील लेण्याला जागतिक वस्तुशास्त्रात अन्यनसधारण महत्त्व आहे. या लेण्यांमधील ज्या साधूंच्या खोल्या आहेत, त्या उतरत्या पायावर बांधल्या गेल्या आहेत आणि या सर्वच लेण्याच्या आकरत कोरण कोरण काढण्यात आल्या आहेत.

यातील सर्व उल्लेखनीय मंदिर म्हणजे वेरूळ येथे राष्ट्कुटांच्या काळात निर्माण करण्यात आलेले कैलास लेणे होय

इस्लामकालीन वास्तुकला:

महाराष्ट्रातील इस्लामिक काळातील वास्तुकलेचे केंद्रीकरण औरंगाबाद व आसपासच्या प्रदेशात झाले आहे.
बिवी का मकबरा, गोलघुमट, औरंगजेबाची कबर यासारख्या इस्लामिक वास्तुकलेची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहता येतात.

गड़-किल्ले:

महाराष्ट्रातील वास्तुकलेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील गड़-किल्ले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याच्या संरक्षणासाठी या गड़-किल्ल्यांची उभारणी केली.

३४०-४०० वर्षांनंतर आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या गौरवशाही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. हे किल्ले भुईकोट, जलदुर्ग त्याचप्रमाणे डोंगरी किल्ले आहेत.

या किल्ल्यांचा मुख्य उद्देश संरक्षण हा असल्याचे त्यांच्या रचनेवरून स्पष्ट होते. हे किल्ले मोठ-मोठे दगड, चुना, गुळ इ.साहित्य वापरून बनविण्यात आले आहेत.

हे किल्ले मुख्यत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर वसले आहेत

वाडा पद्धती:

महाराष्ट्रात नागर समाजात कौटुंबिक वापरासाठी असलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे वाडा होय. ही पद्धती पेशवे काळात उदयास आली.

वाडा पद्धती ही मुघल, राजस्थानी आणि गुजराती शैलीचे मिश्रण आहे. हे वाडे किमान दुमजली आणि चौसोपी असतात.

ब्रिटिशकालीन वास्तु: 

भारतातील ब्रिटिशांच्या प्रदीर्घ राजवटीचा प्रदीर्घ परिणाम महाराष्ट्रातील वास्तुशिल्पांवर झाला आहे.ब्रिटिशकालीन वास्तुशैलीचे केंद्रीकरण मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात झाले आहे.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस, अफगाण मेमोरियल चर्च इ.


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम येथील नृत्यकला त्याचप्रमाणे वास्तुकलेवर झाला आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.