धोक्यात आलेल्या प्रजातींचे निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने संवर्धनाच्या दृष्टीने केलेले वर्गीकरण:

संकटग्रस्त प्रजाती: या प्रजातींची जीवसंख्या अत्यंत कमी झालेली असते. भविष्यात विशेष उपाययोजना न केल्यास नजिकच्या काळात या प्रजाती नष्ट होउ शकतात.
उदा. हेल्ड वानर
दुर्मिळ प्रजाती: यांची संख्या खुपच कमी असते. ह्या स्थान प्रविष्ठ असल्याने जलदगतीने नामशेष होउ शकतात.
उदा. रेड पांडा
संवेशनशील प्रजाती: या प्रजितीची संख्या अत्यंत कमी असते व ती दिवसेंदिवस घटत जात असते. सातत्याने घटणारी संख्या हेच मुख्य चिंतेचे कारण असते
अनिश्चित प्रजाती: या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात. मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सक्तींमुळे त्यांच्याबाबत कोणतीही विशिष्ठ आणि ठोस माहिती उपलब्ध नसते

निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनची रेड लिस्ट: निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने या निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जागतिक संघटनेने १९६३ मध्ये ही यादी पहिल्यांदाच प्रसिद्ध केली. या यादीमध्ये गुलाबी पृष्ठे म्हणजे संकटग्रस्त प्रजाती आणि हरित पृष्ठे म्हणजे पूर्वी संकटग्रस्त असणार्या परंतु संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे या धोकयामधून बाहेर पडलेल्या प्रजाती

महाराष्ट्रातील वन्यजीवन:

जागतिक हॉटस्पॉट ठरलेल्या पश्चिम घाटाचा बाराचसा भाग महाराष्ट्रात बसलेला आहे. एकूण १६०० किमी लांबीपैकी महाराष्ट्रातील लांबी ४४० किमी आहे. महाराष्ट्रात एकूण ४१ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने व ४ व्याघ्र राखीव क्षेत्रे आहेत

आंतरराष्ट्रिय पातळीवर केलेले काही करार:

रामसार करार (१९७१): इराणमधील रामसार या शहरात २ डिसेंबर १९७१ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. दलदली परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन कराराची उदिष्ठे आहेत. १९७१ मध्ये करण्यात आलेला हा करार मात्र १९७५ साली अमलात आला. भारतामध्ये जगभरातील क्षेत्रांपैकी २६ क्षेत्रे आहेत यापैकी केरळ राज्यामध्ये ३ रामसार क्षेत्र आहेत
सीआयटीइएस करार (१९७५): या करारात प्राणी व वनस्पती प्रजातींच्या बाबतीत होनरया व्यापारामुळे जीवप्रजाती धोक्यात येणार नाहीत याची खात्री केली जाते 
जागतिक वारसा करार (१९७२): जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा शोध आणि संवर्धन ही या कराराची मुख्य उद्दिष्टे आहेत 
नागोया करार : विविध जीवप्रजातींनी उपलब्ध केलेली जनुकीय संसाधने ही स्थानीक जनसमुदायाच्या मालकीची असतात, ती खासगी मालकीची नसतात हे हा करार मान्य करतो 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.