दरवाजा बंद अभियान
केंद्र सरकार द्वारे 30 मे, 2017 रोजी संपूर्ण देशामध्ये शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी दरवाजा बंद नावाने अभियान सुरू करण्यात आले.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या अभियानाद्वारे भारतातील गावांमध्ये शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी व्यक्तींना प्रेरित करण्यात येईल.
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची अभियानाचे जाहिरात प्रतिनिधी (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रमुख बिंदु
- या अभियानात जागतिक बँकेचे समर्थन प्राप्त आहे.
- हे अभियान देशभरात एकाच वेळी चालू करण्यात येईल.
- हे अभियान यासाठी सुरू करण्यात आले आहे की अशा व्यक्तींना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे ज्यांच्या घरामध्ये शौचालय असूनही त्याचा वापर करत नाहीत.
- या अभियानाअंतर्गत अभिनेत्री अनुष्का शर्मा स सहभागी करण्यात आली आहे अनुष्का शर्मा या अभियानात गावातील महिलांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रेरित करेल.