संपदा योजना
संपदा योजना

संपदा योजना

संपदा योजना म्हणजे कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योग विकास योजना. (Scheme for Agro Marine processing and Development of Agro Processing Clusters)

संपदा योजना आसाम जिल्ह्यातील धमाजी जिल्ह्यातून भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (ICAR) परिषद समारंभप्रसंगी 26 मे, 2017 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे लागू करण्यात आली.

संपदा योजनेस प्राथमिक स्वरूपात 3 मे, 2017 रोजी आर्थिक विषयाशी संबंधित मंत्रिमंडळ समितीद्वारे मान्यता देण्यात आली होती।

संपदा योजनेस मंजुरी चौदाव्या वित्त आयोग कालावधी बरोबर वर्ष 2016 – 2020 या कालावधीसाठी देण्यात आली आहे.

उद्देश –

  • शेतमालाला अधिक उठाव निर्माण करून कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देणे.
  • संपदा योजनेच्या कार्यवाहीसाठी सरकारद्वारे 6000 कोटी रुपये वितरित करण्याचे नियोजित करण्यात आली आहे.
  • 600 कोटी रुपयांमध्ये 31. 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यामधून 334 लाख मेट्रिक टन कृषी उत्पादन मिळेल.
  • संपदा योजनेतून वर्ष 2019 – 20 च्या दरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात संपूर्ण देशात 5, 30, 500 रोजगार निर्माण होऊन 20 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
  • संपदा योजनेअंतर्गत मंत्रालयाद्वारे खालील योजना राबविण्यात येतील
  1. मेगा फूड पार्क
  2. एकीकृत गोल्ड चेन आणि वेल्यू एडिशन इन्फ्रास्ट्रक्चर
  3. फूड सेफ्टी अँड क्वालिटी एश्योरेंस इन्फ्रास्ट्रक्चर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.