द्रावणांची संहती

 द्रावण द्रव्य आणि द्रावक यांच्या समांगी मिश्रणाला द्रावण असे म्हणतात. 

द्राव्य:

जो पदार्थ द्रावकात विरघळतो त्यास द्राव्य असे म्हणतात. 

द्रावक:

द्राव्य ज्यामध्ये विरघळते त्यास द्रावक असे म्हणतात. 

द्रावणांचे गुणधर्म 

  1. द्रावण हे एक प्रकारचे समांगी मिश्रण असते. 
  2. द्रावणातील द्रव्याचे द्रव्याचे सूक्ष्म कण उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. 
  3. द्रावणातून प्रकाश किरणांचे विकिरण होत नाही.
  4. द्रावणातून गाळण प्रक्रियेने द्राव्य वेगळे करता येत नाही. 

द्रावणांचे प्रकार

1) जलीय द्रावण 

ज्या द्रावणामध्ये द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग केला जातो, त्या द्रावणास जलीय द्रावण असे म्हणतात. 

उदा. मीठाचे पाण्यातील द्रावण, साखरेचे पाण्यातील द्रावण, युरियाचे पाण्यातील द्रावण, ग्लिसरॉलचे द्रावण, सोडियम हायड्रॉक्साइडचे द्रावण

2) अजलीय द्रावण 

ज्या द्रावणामध्ये द्रावक म्हणून पाण्याऐवजी केरोसीन/ रॉकेल, कार्बन डाय-सल्फाइड, मिथिल बेंझीन तसेच एसीटोन यासारख्या सेंद्रिय संयुगांचा उपयोग केला जातो, त्या द्रावणात द्रावणात अजलीय द्रावण असे म्हणतात. 

उदा: सल्फर डायॉक्साईडचे द्रावण, अँटिमनी ट्राय क्लोराईडचे द्रावण, हाइड्रोजन क्लोराईडचे द्रावण 

3) तीव्र /संहत द्रावण

 ज्या  द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण द्रावकापेक्षा/ आवश्यकतेपेक्षा जास्त असते, त्या द्रावणाला तीव्र किंवा संहत द्रावण असे म्हणतात. 

उदा. तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल, तीव्र सल्फ्युरिक आम्ल, तीव्र नायट्रिक आम्ल, ग्लेसिएल अॅसिटीक आम्ल 

4) सौम्य/ विरल द्रावण 

ज्या द्रावणामध्ये द्रावकाचे प्रमाण द्राव्यापेक्षा/ आवश्यकतेपेक्षा जास्त असते, त्या द्रावणाला सौम्य किंवा विरल द्रावण असे म्हणतात. 

उदाहरण सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल, सौम्य सल्फ्युरिक आम्ल, सौम्य नायट्रिक आम्ल इ. 

5) विद्युत अपघटनी द्रावण

ज्या द्रावणामध्ये मुक्त आयन असतात तसेच त्यातून वीज प्रवाहित होऊ शकते, त्या द्रावणाला विद्युत अपघटनी द्रावण असे म्हणतात

उदाहरण. सोडियम क्लोराइड चे द्रावण, कॉपर क्लोराइडचे द्रावण, हायड्रोक्लोरीक आम्लाचे द्रावण, सल्फ्युरिक आम्लाचे द्रावण, समुद्राचे पाणी, अमोनियाचे द्रावण इ. 

6) विद्युत अनपघटनी द्रावण

 या द्रावणांमध्ये मुक्त आयन नसतात तसेच त्यातून वीज प्रवाहित होऊ शकत नाही, त्या द्रावणाला विद्युतअनपघटनी द्रावण असे म्हणतात 

उदाहरण: साखरेचे द्रावण, युरियाचे द्रावण, ग्लिसरीनचे द्रावण

द्रावकाच्या, भौतिक स्थितीवरून द्रावणाचे प्रकार

वायु:

जेव्हा द्रावक वायु असते तेव्हा त्यात द्रव्य म्हणून फक्त वायुरूप पदार्थ पदार्थच विशिष्ट परिस्थितीमध्ये एकत्र येतात तेव्हा वायुरूप द्रावण तयार होते

उदाहरण हवा

द्रव

जेव्हा द्रावक द्रव असते तेव्हा द्राव्य म्हणून त्यामध्ये वायु, द्रव तसेच स्थायुरूप पदार्थ विरघळू शकतात. 

उदाहरण:

1) द्रवामध्ये वायू – पाण्यात ऑक्सिजन, पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइड, रक्तात पोटॅशियम कॅल्शियम आयन 

2) द्रवामध्ये द्रव – अल्कोहोल आणि पाणी, लिंबू सरबत 3 द्रवामध्ये स्थायू – पाण्यात साखर, पाण्यात मीठ, रक्तात पोटॅशियम – कॅल्शियम आयन

 स्थायू 

जेव्हा द्रावक स्थायू असते तेव्हा द्राव्य म्हणून वायु, द्रव तसेच स्थायुरूप पदार्थ त्यात विरघळू शकतात. 

उदा: 

1) स्थायूमध्ये वायु: पॅलॅडियम धातूमध्ये हायड्रोजन वायू

 2) स्थायू मध्ये द्रव: सोने /चांदीमध्ये पारा (पारद संमिश्र), पॅराफीन मध्ये हेक्झेन 

3 स्थायूमध्ये स्थायू: पोलाद (लोह +कार्बन) पितळ (तांबे + जस्त), कांस्य (तांबे +कथिल) 

विद्युत अपघटन

विद्युत अपघटन विद्युत घटामध्ये घडून येते. विद्युत घट आला दोन इलेक्ट्रोड असतात. त्यातील एक धनप्रभारित तर एक ऋणप्रभारित असतो. धनप्रभारित इलेक्ट्रोडला धनाग्र किंवा एनोड असे म्हणतात. ऋण प्रभारित इलेक्ट्रोडला ऋणाग्र किंवा कॅथोड असे म्हणतात. 

एखाद्या द्रावणाचे विद्युत घटामध्ये विद्युत अपघटन घडवून आणल्यास त्यात धन तसेच ऋण आयन तयार होतात. धन आयन ऋणप्रभारित इलेक्ट्रोडवर म्हणजेच कॅथोडवर जमा होतात. तसेच ऋण आयन धनप्रभारित इलेक्ट्रोड वर म्हणजेच अॅनोडवर जमा होतात. 

उदा. 1) सोडियम क्लोराइड च्या द्रावणातून विज प्रवाहित केली असता त्यांचे अपघटन होऊन सोडियम हायड्रॉक्साइड हे संयुग तयार होते, अॅनोडवर क्लोरीन वायू मुक्त होतो, व हायड्रोजन वायू कॅथोड वर जमा होतो. 

2) वितळलेल्या सोडियम क्लोराइडमधून वीज प्रवाहित केली असता त्यांचे अपघटन होऊन सोडियम कॅथोडवर  जमा होतो तर क्लोरीन अॅनोडवर मुक्त होतो. उच्च तापमानास वितळलेल्या मिठाच्या अवस्थेला सम्मिलित अवस्था म्हणतात. 

द्रावणीयता 

एका संयुगाच्या दुसऱ्या संयुगांमध्ये विरघळण्याच्या क्षमतेला द्रावणीयता असे म्हणतात. 

जेव्हा एक द्रव दुसऱ्या द्रवामध्ये पूर्णपणे विरघळतो तेव्हा समांगी द्रावण तयार होते, तर जेव्हा दोन पदार्थ एकमेकांत विरघळत नाहीत तेव्हा असमांगी द्रावण तयार होते. 

द्रावकीय ऊर्जा 

जेव्हा एखादे द्राव्य द्रावकात विरघळते तेव्हा द्राव्य विरघळण्यासाठी द्रावकामार्फत वापरल्या गेलेल्या ऊर्जेला द्रावकीय ऊर्जा असे म्हणतात. 

जेव्हा एखादे द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग केला जातो, तेव्हा पाण्यामार्फत वापरल्या जाणाऱ्या द्रावकीय ऊर्जेला जलीय ऊर्जा असेही म्हणतात. 

पाणी या द्रावकामध्ये विविध प्रकारचे द्राव्य विरघळू शकतात त्यामुळेच पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.