गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अपघात ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या दुखी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने 2015- 16 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी जन्मा अपघात विमा योजना सुरू केली.

या विमा योजनेअंतर्गत सातबारा उतारा धारक 1.37 कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आली असून दहा ते 75 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना 13 प्रकारच्या धोक्यांसाठी विमा सुरक्षा पुरविण्यात आले आहे

रस्ता अपघात रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश विंचूदंश नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या जनावरांची खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू दंगल व अन्य कोणतेही अपघात

विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ पुढील प्रमाणे

  1. अपघातामुळे मृत्यू – रुपये 2 लाख
  2. अपघातामुळे अपंगत्व – रुपये 1 लाख किंवा रूपये 2 लाख यामध्ये

  • अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी होणे – रुपये 1 लाख
  • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे – रुपये 2 लाख
  • अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे – रुपये 2 लाख

सन 2016 – 17 मध्ये शासनाने 1 डिसेंबर, 2016 ते  30 नोव्हेंबर, 2017 या कालावधीच्या विमा हप्त्यापोटी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मर्यादित यांना 31.04 कोटी रुपये रक्कम अदा केली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.