भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा राष्ट्रिय आणि स्थानिक आव्हानातून प्रोत्साहित, प्रयत्नामधून प्रेरित, भारतातील राजकीय संघाटनांद्वारा संचालित अहिंसावादी त्याचप्रमाणे सैन्यवादी आंदोलन होते. ज्याचे फक्त एकच उद्दिष्ट होते इंग्रजी शासकांना भारतीय महाद्वीपातून हुसकावून लावणे. ह्या आंदोलनाची सुरुवात १८५७ मध्ये शिपायांच्या बंडातून झाली असे मानले जाते. स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. त्यामध्ये अनेक छोटे मोठे क्रांतिकारक सहभागी होते. १९२० पर्यंत स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्त्व लोकमान्य टिळकांनी केले तर त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी नेतृत्त्व केले.


भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही महत्त्वाच्या गोष्ठी:

१४९८ –वास्को दा गामा भारतीय जमिनीवर उतरला
१६०० –ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली
१७४८ –भारतामध्ये एंग्लो-फ़्रांस/कर्नाटक युद्ध झाले (ब्रिटिशांनी जिंकले
१७५७ –प्लासीची लढाई (ब्रिटिशांनी लढाई जिंकली)
१७७५ –पहिले एंग्लो मराठा युद्ध (मराठे जिंकले)
१७९९ –ब्रिटिशांनी टीपू सुलतानाला हरविले
१८०३ –  एंग्लो मराठा युद्ध (ब्रिटिशांनी जिंकले)
१८१७ –तीसरे एंग्लो मराठा युद्ध (ब्रिटिशांनी जिंकले)
१८४६ –एंग्लो शिख युद्ध (शिखांचा पराभव)
 १८५७ – भारतीय स्वातंत्र्याचे पहिले बंड/ १८५७ चा उठाव
१८८५ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
१९०५ – इंग्रजांनी बंगालची फाळणी केली
१९१५ – एनी बेसेंट यांनी होमरूल चळवळीची स्थापना केली
१९१९ –खिलाफत आंदोलन, जलियानवाला बाग हत्याकांड, रौलट कायदा
१९२१ –  महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली
 १९२२ –  चौरीचौरा कांड, गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली
 १९२८ –  साइमन कमिशनचा विरोध करतेवेळी लाला लाजपत राय यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यात ते गंभीर जखमी झाले
 १९३० –  गांधीजीनी दांडी यात्रा काढली आणि मिठाचा सत्याग्रह केला, पहिली गोलमेज परिषद
 १९३१ –दूसरी गोलमेज परिषद आणि गांधी-इरविन करार
 १९३२ –तीसरी गोलमेज परिषद
१९४२ –भारत छोड़ो आंदोलन
१९४६ – नौसेनेचा उद्रेक (मुंबई)
१९४७ –  भारताचे विभाजन, इंग्रजांनी भारत सोडला, अर्ध्या रात्रीमध्ये भारत इंग्रजांपासून मुक्त
१९६१ – गोवा पुर्तगालपासून मुक्त

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.