जलयुक्त शिवार अभियान
जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान

महाराष्ट्र राज्यातील पावसाची अनियमितता व पावसातील खंड ह्यांचा पिकांच्या वाढीच्या काळात होणारा दुष्परिणाम व त्यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे ही समस्या दूर करण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलसंवर्धन अंतर्गत विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेची संकल्पना पुढे आली.

महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 5 डिसेंबर, 2014 रोजी घेतला.

भूजल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी शासन सिंचन सुविधांच्या निर्मितीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे असा या अभियानाचा मुख्य हेतू आहे

यासाठी पाणी यांचा मुक्त महाराष्ट्र 2019 हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्ध रित्या कृती आराखडा तयार करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

उद्देश

  1. महाराष्ट्र राज्याला 2019 पर्यंत पाणीटंचाई मुक्त राज्य करणे.
  2. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे.
  3. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे
  4. राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे
  5. पाणी अडविणे जिरवणे आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे
  6. शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
  7. राज्यातील सर्वांना पुरेशा पाण्याची शाश्वता
  8. ग्रामीण भागात बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीवी करू करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे
  9. भूजल अधिनियम अंबलबजावणी
  10. पाणीसाठवण क्षमता निर्माण करणे
  11. विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे
  12. वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन जनजागृती करणे
  13. जलयुक्त शिवार अभियान जलप्रवाहाची रुंदीकरण व खोलीकरण सिमेंट व मातीच्या बंधाऱ्याचे बांधकाम कालव्यांची कामे व शेततळी होण्याची कामे समाविष्ट करण्यात येतात

जलयुक्त शिवार अभियानात  दर वर्षी 5000 हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

या योजनेत सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म सिंचन पद्धतीत प्रोत्साहन देण्यात येत आहे.

ही योजना विविध विभागांकडे जलसंधारणाच्या विविध योजना जिल्हा वार्षिक योजना स्वयंसेवी संस्था लोकवर्गणी व खाजगी उद्योजक यांच्याकडील निधी एकत्रित करून अभियानाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 2014 -152015 -16 मध्ये 34 जिल्ह्यातील 6205 गावे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी निवडण्यात आली.

ऑक्टोंबर 2015 अखेर या निवडलेल्या गावांतून जलसंधारणाची 1,30,761 कामे पूर्ण करण्यात आली.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.