नवसंजीवनी योजना
नवसंजीवनी योजना 1996- 97 5वी आदिवासी क्षेत्र साधारणपणे दुर्गम भागात सुरू करण्यात आली.
उद्देश
आदिवासी लोकांसाठी असलेल्या पाणीपुरवठा आरोग्य सुविधा इत्यादी सारख्या निरनिराळ्या योजनांची एकात्मिक पणे व समन्वयाने अंमलबजावणी करणे व त्यांना बळकटी निर्माण करणे
नवसंजीवन योजनेची आदिवासी उपयोजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र मिनी माढा क्षेत्र खंड आणि राज्यातील क्षेत्र खंड अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत आहे
नवसंजीवनी योजनेचे मुख्य अंमलबजावणी अधिकारी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्य करतात. तसेच सक्रिय सहयोगी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्य पार पाडतात.
नवसंजीवनी योजना अंतर्गत समाविष्ट योजना
- रोजगार कार्यक्रम
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
2. आरोग्यसेवा
- प्राथमिक आरोग्यविषयक सुविधांची तरतूद करणे
- शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे
- पोषण कार्यक्रम
- एकात्मिकृत बालविकास योजना
- शालेय पोषण कार्यक्रम
- अन्नधान्याचा पुरवठा
- रास्त भावाच्या दुकानांमार्फत अन्नधान्याचे वितरण
- सुधारित लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारा वितरण पद्धती
- पाच खावटी कर्ज योजना
- सहा धान्य बँक योजना
नवसंजीवनी योजनेत जिल्हाधिकाऱ्या द्वारे क्षेत्र क्षेत्र खंड गावी निश्चित करताना पुढील निकष विचारात घेतले जातात
- अलीकडेच दुर्गम म्हणून घोषित करण्यात आलेली गावे
- गतकाळाच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण झाली आहे ती गावी
- पावसाळ्यात दळण-वळणाच्या संपर्क तुटणारी गावे
- जागांमध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही अशी गावी
- एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ज्या गावांमध्ये अंगणवाड्या नाहीत अशी गावे
- प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र पासुन खुप लांब असलेली गावे
- पावसाळ्यात गावांमध्ये रोजगार मिळणे अवघड काम असते अशी गावे
- ज्या गावांमध्ये रास्त भाव दुकाने नाहीत अशी गावे
आदिवासी भागातील माता आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने 16 जिल्ह्यातील 8419 गावांमध्ये 173 फिरत्या वैद्यकीय पथकांद्वारे नवसंजीवनी योजना राबविण्यात येत आहे.
मातृत्व अनुदान योजनेअंतर्गत प्रसूतिपूर्व आरोग्य तपासणी करिता वैद्यकीय केंद्राला भेट देण्यासाठी आदिवासी महिलेला 400 रुपये रोख व चांगले आरोग्य राखण्यासाठी 400 रुपये औषधे पुरविण्यात येतात.