तयांना पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष योगदानाबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2021 मिळाला आहे.
तयांनी 5,000 हून अधिक महिलांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे.
तया ‘कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी दुष्काळी उस्मानाबाद भागातील 3,000 हून अधिक महिलांना मदत केली आहे. त्यांनी कोंबड्याच्या प्रमुख प्रजातींसाठी (चिकन) पोल्ट्री कार्यपद्धतीही स्थापित केली आहेत.
तयांना पुण्यातील स्वयं शिक्षण प्रयोगाच्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वच्छ उर्जा कार्यक्रमा अंतर्गत ‘वुमन इन क्लीन एनर्जी प्रोग्रॅम’ मध्ये ‘ऊर्जा सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे.
तयांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी 3,000 हून अधिक घरे उजळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यापूर्वी निती आयोगाने त्यांना 2017 मध्ये वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने तर सीआयआय फाउंडेशनने ‘वुमन एक्झम्प्लर अवॉर्ड’ने सन्मानित केले आहे.
राष्ट्रपती कोविंद यांनी कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला
‘नारी शक्ती पुरस्कार’ हा महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे ज्याने व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या अपवादात्मक योगदानाची कबुली दिली जाते, महिलांना गेम चेंजर्स आणि समाजात सकारात्मक बदलाचे उत्प्रेरक म्हणून साजरे केले जाते. हे पुरस्कार समाजाच्या प्रगतीत महिलांना समान भागीदार म्हणून ओळखण्याचा प्रयत्न आहे.