सायली नंदकिशोर आगवणे – विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना
सायली नंदकिशोर आगवणे – विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना

सायली नंदकिशोर आगवणे यांना कठीण परिस्थितीतही भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2020 देण्यात आला आहे.

जन्मजात डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या आगवणे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून त्यांनी 100 हून अधिक नृत्य कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. ‘डाउन सिंड्रोम’ ग्रस्त सुमारे 50 मुलांना त्या नृत्य शिकवतात.

यापूर्वी, राज्य सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने त्यांना ‘द बेस्ट इंडिव्हिज्युअल पर्सन विथ डिसएबिलिटी (महिला) – 2012’ श्रेणी अंतर्गत ‘स्पंदन राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.