लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य ‘भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे’ हे असते, अर्थात राज्य कारभारच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

‘लोकसभा’ हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २०१६ पर्यंत भारतामध्ये १६ लोकसभा कालावधी झाले आहेत.

लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ़ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून थेट निवडणूक केली जाते.

भारताच्या राज्य घटनेनुसार लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य जास्तीत जस्त असू शकतात, त्यात ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत तर २ सदस्य एँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.


प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणिबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यांमध्ये ५ वर्षांहुन अधिक काळही वाढवता येतो.

राज्यागणिक मतदारसंघ:

 विभाग प्रकारमतदारसंघ
अंदमान आणि निकोबार बेटेकेंद्रशासित प्रदेश
आंध्र प्रदेशराज्य२५
अरुणाचल प्रदेशराज्य
आसामराज्य१४
बिहारराज्य४०
चंडीगढ़केंद्रशासित प्रदेश
छत्तीसगढ़राज्य११
दादरा आणि नगर हवेलीकेंद्र शासित प्रदेश
दमन आणि दिवकेंद्रशासित प्रदेश
दिल्लीकेंद्रशासित प्रदेश
गोवाराज्य
गुजरातराज्य२६
हरियाणाराज्य१०
हिमाचल प्रदेशराज्य
जम्मू आणि कश्मीरराज्य
झारखण्डराज्य१४
कर्नाटकराज्य२८
केरळराज्य२०
लक्ष्यद्वीपकेंद्रशासित प्रदेश
मध्य प्रदेशराज्य२९
महाराष्ट्रराज्य४८
मणिपुरराज्य
मेघालयराज्य
मिझोरमराज्य
नगालैंडराज्य
ओडिशाराज्य२१
पुदुच्चेरीकेंद्रशासित प्रदेश
पंजाबराज्य१३
राजस्थानराज्य२५
सिक्किमराज्य
तामिळनाडूराज्य३९
तेलंगानाराज्य१७
त्रिपुराराज्य
उत्तराखंडराज्य
उत्तर प्रदेशराज्य८०
पश्चिम बंगालराज्य४२

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.