महाराष्ट्राचा हवामान
हवामानाची संकल्पना
वातावरण
पृथ्वीभोवती अनेक वायू पाण्याची वाफ धूलिकण इत्यादींनी बनलेले जे आवरण आहे त्यालाच वातावरण असे म्हणतात
हवामान
एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे हवामान होय
विषम हवामान
उन्हाळ्यात अधिक उष्ण तर हिवाळ्यात अधिक थंड अशा भागाचे हवामान विषम हवामान म्हणतात
उदाहरण:- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा
सम हवामान
उन्हाळ्यात सौम्य तर हिवाळ्यातही सोमी अशा प्रकारच्या हवामानाला सम हवामान म्हणतात
उदाहरण:- कोकण किनारपट्टी
महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय मोसमी वार्याच्या प्रदेशात येतो
तापमान कक्षा
कमाल तापमान (दिवसाचे) व किमान तापमान (रात्रीचे) यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा होय.
दैनिक तापमान कक्षा
दिवसभरातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय.
टीप:- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते.
वार्षिक तापमान कक्षा
वर्षातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय.
महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त (अधिक) असते तर पश्चिमेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा कमी असते.
आर्द्रता (Humidity)
वातावरणात बाष्पाचे प्रमाणावर आर्द्रता ठरवली जाते
महाराष्ट्रात पश्चिमेला लागून अरबी समुद्र असल्याने पश्चिम किनारपट्टीला आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे.
जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान ना प्रमाण जास्त तर हिवाळा व उन्हाळ्याच्या काळात कमी असतो
आरोह पाऊस (Conventional Rainfall)
सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते व प्रसरण पावते. ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने चढू लागते वर जात असताना हवेचे तापमान कमी होत जाते व विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर क्युमिल्स निंबल्स नावाच्या ढगात रूपांतर होते व हे ढग त्या क्षेत्राला पाऊस देतात व यालाच आरोह पाऊस म्हणतात.
उदाहरण:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अशा प्रकारचा पाऊस पडतो.
प्रतिरोध पाऊस
समुद्रावरून पाहणाऱ्या बाष्पयुक्त हवेच्या मार्गात पर्वत आडवे आल्यास बाष्पयुक्त हवा अडवली जाते आणि त्यामुळे पर्वतावर पाऊस पडतो.
पर्वताच्या उतारावर जोरदार वृष्टी होते त्याच प्रतिरोध प्रकारचे पाऊस असे म्हणतात
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या उतारावर अशा प्रकारची पाऊस पडतो.
कृत्रिम वर्षा
पर्जन्य योग्य ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद रीतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम वर्षा होय.
यात प्रथम ढगांचे तापमान मोजली जाते.
0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग व 0°C पेक्षा कमी तापमान असणारे शित ढग या ढगांवर सोडियम क्लोराइड घनरूप कार्बन-डाय-ऑक्साईड सिल्व्हर आयोडाईड ढगांच्या तळाशी करतात.
उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो.
महाराष्ट्र सर्वप्रथम हा प्रयोग 2003 मध्ये करण्यात आला होता.
दुष्काळ
दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षाचा एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस होणे.
जर पावसाचे प्रमाण 26% – 50% ने कमी झाले असेल तर मध्यम दुष्काळ समजला जातो.
जर सरासरी 50% पेक्षा कमी पाऊस झाल्यास तीव्र दुष्काळ समजला जातो.
महाराष्ट्रात अक्षांश विस्तार 15° उत्तर ते 22° उत्तर अक्षवृत्त असा आहे.
याचा अर्थ महाराष्ट्र उष्णकटिबंधीय हवामानात मोडला जातो.
म्हणून महाराष्ट्रात उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू आढळून येतात.
हवामानाच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येतो
महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक
महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणार्या अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार नैऋत्य व ईशान्य मौसमी वारे व पूर्वेकडील पठारी प्रदेश या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत असतो
महाराष्ट्रातील ऋतू
पृथ्वीचे लंबवत्तुळाकार परिभ्रमण व तिचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे ऋतुंची निर्मिती होते. परिभ्रमणामुळे जेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.
- २२ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात याच काळात हिवाळा असतो.
- २३ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
उन्हाळा:-
21 मार्च नंतर सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात लंबरूप पडण्यास सुरवात होते त्यामुळे येत्या महिन्यापासून चैत्र उन्हाळ्याची सुरूवात होते. त्यामुळे या महिन्यापासून चैत्र उन्हाळ्याची सुरूवात होते.
साधारणतः मे महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जाते.
उच्च तापमान व कोरडी हवा हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य आहे.
तापमान व तापमान कक्षा
कोकण किनारपट्टी
कोकण किनारपट्टीत दैनिक कमाल तापमान 33°C पर्यंत नोंदविले गेले आहे.
या भागात मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदविले जाते.
कारण मे मध्ये या भागातून नैऋत्य मौसमी वारे वाहण्यास सुरूवात होते.
कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान कक्षा 6°C च्या जवळपास आढळून येते. येथील तापमान सम आहे.
पश्चिम पठार
पश्चिम पठारावरील भागात उन्हाळ्यात 35°C- 40°C पर्यंत तापमान आढळते.
तापमान कक्षा दिवसात 12°C- 15°C पर्यंत असते.
पूर्व पठार विदर्भ
पूर्व पठारावर अधिकतम तापमान 40°C – 45 °C आहे.
या भागातील तापमान कक्षा 20 °C पर्यंत जातो.
उन्हाळ्यातील पाऊस
उन्हाळा हा कोरडा ऋतू असल्याने या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, परंतु काही ठिकाणी उन्हाळ्यात पाऊस नोंदविला आहे.
हा पाऊस मुख्यतः दक्षिण महाराष्ट्र, कोकण व विदर्भात बघण्यात येतो.
दक्षिण महाराष्ट्रात या पावसाला वळवाचा पाऊस तर किनारपट्टीवर या पावसाला आंबेसरी असे म्हणतात.
आंबेसरी पाऊस मे महिन्यात पडतो. महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या काही भागात 10सेंटीमीटर -12.5 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो पडतो.
हिवाळा
23 सप्टेंबर नंतर दक्षिण गोलार्धातील लंबरूप किरणे पडण्यास सुरुवात होते व त्याचा परिणाम उत्तर गोलार्धात दिवसाची कालावधी कमी होते.
महाराष्ट्रात हिवाळा ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत असतो.
हवा थंड असते व कोरडी असते.
राज्यात विविध ठिकाणी डिसेंबर मध्ये नोंदविलेले तापमान
हिवाळ्यातील तापमान व तापमान कक्षा
कोकण किनारपट्टी
पश्चिमेला अरबी समुद्र मुळे हवामान समूह असते व हवा उबदार असते. तापमान कक्षा 10 °C च्या जवळपास असते.
पश्चिम पठारी प्रदेशात
येथे तापमान 15 °C पेक्षाही कमी नोंदविले जाते. तर तापमान कक्षा 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड च्या दरम्यान असते.
पूर्व पठारी प्रदेश
पूर्व पठारी प्रदेशावर किमान तापमान 15 °C पेक्षाही कमी असते व हवामान विषम असल्यामुळे तापमान कक्षा अधिक आढळून येते.
तापमान कक्षा सर्वाधिक- विदर्भ/ पूर्व पठार
तापमान कक्षा सर्वाधिक उन्हाळ्यामध्ये मध्ये – विदर्भ /पूर्व पठार
तापमान कक्षा सर्वाधिक हिवाळ्यामध्ये – पश्चिम पठार
वायुभार (Air Pressure)
हिवाळ्यात वायुभार हा विदर्भात अधिक असतो तर नैऋत्याकडे (कोकण) मध्ये कमी असतो.
तर उन्हाळ्यात वायुभार कोकणात जास्त असतो तर विदर्भात कमी असतो.
सर्वाधिक वायुदाब नोंदविलेले ठिकाण
हिवाळ्यात भंडारा (1020 mm) तर उन्हाळ्यात सर्वाधिक वायुभार रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे नोंदविले गेले आहे
सापेक्ष आर्द्रता
हिवाळ्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आर्द्रता पावसाळ्यापेक्षा कमी असते परंतु उन्हाळ्यापेक्षा जास्त असते.
सर्वाधिक सापेक्ष आर्द्रता कुठल्याही महिन्यात कोकणात 64% जास्त असते.
पर्जन्य
हिवाळ्यात आकाश स्वच्छ असते. परंतु पूर्व पठारावर (विदर्भ) काही भागात ऑक्टोंबर- जानेवारी या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
या कालावधीत ईशान्य मान्सून पासून पूर्व पठारावर ऑक्टोबर जानेवारी महिन्यात पाऊस पडतो.
पावसाळा
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नैऋत्य वार्यापासून मिळतो.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस 85% नैऋत्य मान्सून मुळे भेटतो.
श्रीलंकेत मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे आगमन होते.
केरळमध्ये तिरुअनंतपुरमला 1 जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडतो. त्यानंतर कोलकत्त्याला 7 जूनला व त्यानंतर मुंबईला 10 जूनला पाऊस पडतो.
15 जुलैपर्यंत मान्सून वारे पूर्ण भारतात वाहू लागतात.
सप्टेंबर मध्ये मान्सूनचे निर्गमन होण्यास सुरुवात होते व ऑक्टोंबर पर्यंत सर्व भागातून मान्सूनचे निर्गमन झालेले असते.
ऑक्टोबरला संक्रमणीय काळ असे म्हणतात. ऑक्टोंबर मध्ये उकाडा जाणवतो व यालाच ऑक्टोबर हीट म्हणतात.
महाराष्ट्र सर्वात जास्त पर्जन्य कोकणात आंबोली येथे 707cm पाऊस कोसळतो.
तर महाबळेश्वरला 594 cm पावसाची नोंद आहे.
सह्याद्रीवर पाऊस पडल्यानंतर वारे पूर्वेकडे वाहू लागतात त्यांचे बाष्पधारण शक्ती वाढत जाते यामुळे पश्चिम पठारावर पाऊस झपाट्याने कमी होतोय व त्या क्षेत्रात पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो या प्रदेशाला अवर्षण ग्रस्त प्रदेश म्हणतात.
अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर हे जिल्हे अवर्षणग्रस्त प्रदेशात येतात. येथे कायमचे दुष्काळ असते.
पावसाचे प्रमाण 30 ते 50cm पर्यंत असते.
अवर्षणग्रस्त प्रदेशाचे क्षेत्रफळ 61, 600 चौ कि.आहे.
महाराष्ट्र चे एकूण क्षेत्रफळापैकी 20% प्रदेश अवर्षणग्रस्त मध्ये येतो एकूण लोकसंख्येच्या 6% भाग आहे.
महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस अहमदनगर जिल्ह्यात दहिवड, सातारा जिल्ह्यात म्हैसवड च्या परिसरात पडतो.
येथे पावसाचे प्रमाण 29 – 30 cm आहे.
अरबी समुद्रातून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला अडतात
त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात.
जिल्हा पावसाचे दिवस
सिंधुदुर्ग एकशे दोन दिवस
ठाणे 81 दिवस
गोंदिया 61 दिवस
नागपूर 55 दिवस
नांदेड 49 दिवस
औरंगाबाद बेचाळीस दिवस
सोलापूर 33 दिवस
कोकणामध्ये 250 ते 550 cm पर्यंत पाऊस पडणाऱ्या प्रदेशात 75 – 95 दिवस पाऊस असतो.
मध्य महाराष्ट्रात 50 ते 75 cm व पावसाचे दिवस 30 ते 50 दिवस असतात.
विदर्भ 100 ते 150 cm पाऊस पडणारे सुमारे 60 ते 65 असतात.
महाराष्ट्रात मान्सून काळात सर्वात जास्त पावसाचे दिवस कोल्हापूर जिल्ह्यात गगन बावडा येथे 108 दिवस आहेत या खालोखाल महाबळेश्वर येथे 103 दिवस तर आंबोली ला 97 दिवस आहे.
महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचे दिवस सातारा जिल्ह्यात म्हैसवड येथे एकूण 20 दिवस या खालोखाल अकलूज (सोलापूर), फलटण (सातारा) कमी पावसाचे दिवस आहेत.
पावसाचे दिवस
ठिकाणी दिवस
गगनबावडा 103 129
महाबळेश्वर 103 125
आंबोली 97 118
महाराष्ट्र पर्जन्य – 2015
2015-16 मध्ये 50% ऊन कमी पाऊस पडणारे 5 जिल्हे आहेत.
कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस कोल्हापूर (38.5%) पडला.
महाराष्ट्राचे पावसावर आधारित हवामान विभाग
या प्रकारची विभागणी पावसावर आधारित केली जाते. याचे तीन प्रकार आहेत.
उष्णकटिबंधीय वर्षा विभाग
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा भाग येतो या भागात तापमान 18.2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होत नाही 29 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होत नाही
पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण 200 मीटर असते
उष्णकटिबंधीय दमट व कोरडे किंवा मानसून सवाना प्रदेश
पठारी प्रदेशात सहभाग पूर्व पठार हिवाळ्यातील तापमान 18 डिग्री सेल्सिअस तर उन्हाळ्यातील तापमान 32 डीग्री सेल्सियस कमाल तापमान ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो
उष्णकटिबंधीय शुष्क स्टेपीस हवामानाचा प्रदेश
वार्षिक पावसाची सरासरी प्रमाण 30 ते 70 सेंटिमीटर असते
या क्षेत्रामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश व पश्चिम पठारी प्रदेश येतो