महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari)
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari)

महाराष्ट्र केसरी ही एक भारतीय-शैलीतील कुस्ती स्पर्धा आहे, जी 1854 मध्ये महाराष्ट्र, भारत येथे स्थापन झाली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने याचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र केसरी १९६१- २०१८ कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

महाराष्ट्र केसरी

आयोजकमहाराष्ट्र कुस्तीगीर परिषद
स्थानमहाराष्ट्र
खेळभारतीय पद्धतीची कुस्ती
स्थापना1854; 168 वर्षांपूर्वी;
1961 (वर्तमान स्वरूप)
महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022

पृथ्वीराज पाटील -  महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022
पृथ्वीराज पाटील – महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022

कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी 2022 विजयी बनला आहे.

पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदरआबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळणार आहे.

ठिकाण:छत्रपती शाहू महाराज मैदान, सातारा
महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनल 2022 चे विजेतापृथ्वीराज पाटील
उपविजेताविशाल बनकर
महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022

यंदाची महाराष्ट्र केसरीची 64 वी आवृत्ती आहे.

महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) पहिली आवृत्ती 1961 मध्ये झाली.

स्पर्धा 5 एप्रिल 2022 पासून सुरू झाली. अंतिम सामना आज, 9 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर.

महाराष्ट्र केसरी विजेते

#नाव & स्थान
१)पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, १९६१)
२)पैलवान भगवान मोरे (धुळे, १९६२)
३)पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, १९६४)
३)पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, १९६५)
४)पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, १९६६)
५)पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, १९६७)
५)पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, १९६८)
६)पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, १९६९)
७)पैलवान दादू चौगुले (पुणे, १९७०)
७)पैलवान दादू चौगुले (अलिबाग, १९७१)
८)पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, १९७२)
८)पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, १९७३)
९)पैलवान युवराज पाटील (ठाणे, १९७४)
१०)पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, १९७५)
११)पैलवान हिरामण बनकर (अकलूज, १९७६)
१२)पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, १९७८)
१३)पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, १९७९)
१४)पैलवान इस्माईल शेख (खोपोली, १९८०)
१५)पैलवान बापू लोखंडे (नागपूर, १९८१)
१६)पैलवान संभाजी पाटील (बीड, १९८२)
१७)पैलवान सरदार खुशहाल (पुणे, १९८३)
१८)पैलवान नामदेव मोळे (सांगली, १९८४)
१९)पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, १९८५)
२०)पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, १९८६)
२१)पैलवान तानाजी बनकर (नागपूर, १९८७)
२२)पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, १९८८)
२३)पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, १९९२)
२४)पैलवान उदयराज जाधव (पुणे, १९९३)
२५)पैलवान संजय पाटील (अकोला, १९९४-९५)
२६)पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, १९९५-९६)
२७)पैलवान अशोक शिर्के (वर्धा, १९९६-९७)
२८)पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर, १९९७-९८)
२९)पैलवान धनाजी फडतरे (पुणे, १९९८-९९)
३०)पैलवान विनोद चौगुले (खामगाव, १९९९-२०००)
३१)पैलवान राहुल काळभोर (नांदेड, २००१)
३२)पैलवान मुन्नालाल शेख (जालना, २००१-०२)
३३)पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, २००२-०३)
३४)पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, २००२-०३)
३५)पैलवान सईद चाउस (इंदापूर, २००४-०५)
३६)पैलवान अमोल बुचडे (बारामती, २००५-०६)
३७)पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, २००७)
३७)पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, २००८)
३८)पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, २००९)
३९)पैलवान समाधान घोडके (रोहा, २०१०)
४०)पैलवान नरसिंग यादव (अकलूज – २०११)
४०)पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – २०१२)
४०)पैलवान नरसिंग यादव (भोसरी – २०१३)
४१)पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-२०१४)
४१)पैलवान विजय चौधरी (नागपूर-२०१५)
४१)पैलवान विजय चौधरी (वारजे-२०१६)
४२)पैलवान अभिजीत कटके (भूगाव-२०१७)
४३)पैलवान बाला रफीक शेख (जालना-२०१८)
४४)पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-२०१९)
४५)पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-२०२१-२२)
महाराष्ट्र केसरी विजेते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.