पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले
पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले

पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले.
  • परतिष्ठित तीन मूर्ती संकुलात असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले.
  • स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या 75 आठवड्यांचा उत्सव आहे.
  • ह संग्रहालय तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल जे प्रत्येक पंतप्रधानांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि नवीन भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी त्यावर मात कशी केली हे पाहण्यास सक्षम असेल.

देशाला पुढे नेण्यात प्रत्येक पंतप्रधानांचे योगदान; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : तीन मूर्ती भवनातील ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन.

दशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा विश्वास त्यांनी तरुण पिढीला दिला, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरते.

परत्येक पंतप्रधानाने आपापल्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरे जात देशाला पुढे नेले, काही अपवाद वगळले तर देशाने लोकशाही परंपरा दृढ केली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या उद्घाटनप्रसंगी काढले

सवातंत्र्यलढा, संविधानाची निर्मितीप्रक्रिया आणि देशाच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानातून भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासाचे महत्त्व सांगणाऱ्या ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन गुरुवारी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

दशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांचे भव्य संग्रहालय असलेल्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनाच्या आवारात मोदींच्या ‘मार्गदर्शना’खाली नवे पंतप्रधान संग्रहालय उभे राहिले असून ते पाहण्यासाठी मोदींनी पहिले तिकीट काढले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.