Marathi Llanguage History
Marathi Llanguage History

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे

ऐतिहासिक उत्पत्ती

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.

मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-

वेदकालीन

  वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० – ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.

तमिळ-मराठी भाषा संबंध

मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, “देशी” अशा अर्थाने भाषातज्ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.

भाषातज्ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी “संमत” सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).

संस्कृतपासून मराठी

संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.

भाषाशुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख ‘किर्लोस्कर’ मासिकातून लिहिले. १९२४मध्ये ‘केसरीत’ ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे   आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.

अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).

भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.

प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता.”खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन” हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. ‘सह्याद्री’ आणि ‘लोकशिक्षण’ या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.

प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.

गोल्डन मीन साठी ‘सुवर्णमध्य’ ‘क्रोकोडाइल टियर्स’ साठी ‘नक्राश्रू’; ‘रेकॉर्ड ब्रेक’ ला ‘उच्चांक मोडणे’ हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. ‘कमाल’ शब्द त्याज्य आणि ‘पराकाष्ठा’ तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर ‘प्रयत्नांची पराकाष्ठा’ आणि ‘मूर्खपणाची कमाल’ असा योग्य वापर तो करील. परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, ‘तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल’.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘भाषाशुद्धी’ या प्रश्नाची ‘चळवळ’ होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *