मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan
मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan

अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने

ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७, १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११, १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

अ.क्र.वर्षठिकाणअध्यक्षांचे नाव
95वे2022उदगीर. लातुर, महाराष्ट्रभारत ससाने
94वे2021नाशिक, महाराष्ट्रजयंत नारळीकर
93वे2020उस्मानाबाद, महाराष्ट्रफ्रान्सीस दिब्रिटो
92वे2019यवतमाळ, महाराष्ट्रअरुणा ढेरे
91वे2018बडोदा, गुजरातलक्ष्मीकांत देशमुख
90वे2017डोंबिवली, महाराष्ट्रडॉ. अक्षयकुमार काळे
89वे2016पिंपरी-चिंचवडश्रीपाल सबनीस
88वे2015घुमान, पंजाबसदानंद मोरे
87वे2014सासवड, पुणे, महाराष्ट्रफ. मुं. शिंदे
86वे2013चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्रनागनाथ कोत्तापल्ले
अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने

महिला अध्यक्षा

आजपर्यंत केवळ पाच महिला संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

अ.क्र.वर्षठिकाणअध्यक्षांचे नाव
43वे1961ग्‍वालियरकुसुमावती देशपांडे
51वे1975कराडदुर्गा भागवत
69वे1996आळंदीशांता शेळके
74वे2001इन्दौरविजया राजाध्यक्ष
92वे2019यवतमाळ, महाराष्ट्रअरुणा रामचंद्र ढेरे
महिला अध्यक्षा – अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने

FAQs

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झाले?

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुण्यात झाले

पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?

कुसुमावती देशपांडे (1961, 43वे संमेलनाच्या अध्यक्षा, ग्‍वालियर)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.