- मोज-मापन (MEASUREMENT)
आपल्या सभोवताली असलेल्या सर्व पदार्थ, वस्तू यांचे व्यवस्थित मोजमापन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या एककांनी मोजले जाते.
असे वेगवेगळ्या एकूण चार प्रकारच्या एकक पद्धतीत मोजता येते.
- CGS पद्धत (Centimeter, Gram, second)
- MKS पद्धती (Meter, Kilogram, second)
- FPS पद्धत (Foot, Pound, second)
- SI International system of Unit)
याच्या व्यतिरीक्त एकक (Unit) हे दोन प्रकारे मांडता येते.
1) मूलभूत एकक (Fundamental Unit)
2) साध्य एकक (Derived Unit)
1) मूलभूत एकक (Fundamental Unit)
ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत एकक म्हणतात.
त्यापैकी SI पद्धत ही सर्वत्र स्विकृत आहे.
काही महत्वाची मूलभूत राशी/एकक खालीलप्रमाणे.
अ. क्र. | मूलभूत राशी | मूलभूत एकक | चिन्ह |
1. | लांबी (Length) | मीटर (Meter) | m |
2. | वजन (Mass) | किलोग्रॅम (Kilogram) | kg |
3. | काळ (Time) | सेकंद (Second) | s |
4. | तापमान (Temp) | केल्विन (Kelvin) | K |
5. | विद्युत धारा (electric current) | अम्पियर | A |
6. | तेजस्वी तीव्रता (Luminous Intensity) | कॅन्डेला | cd |
7. | पदार्थाची राशी (Amount of substance) | मोल (Mole) | mol |
2) साध्य राशी/एकक (Derived quantity/Units)
ज्या भौतिक राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात,
Physical quantity | Unit (SI) | Symbol |
Force (0) | newton | N |
Energy (31) | joule | J |
Speed () | Meter/Second | m/s |
Frequency (वारवारता) | hertz | Hz |
Momentum (n) | kilogram meter/second | kg m/s |
Pressure (दाब) | pascal | ра |
Power (20) | watt | W |
Surface tension ( ) | newton per meter | Nm- |
Electric charge | coulomb | C |
( Potential (विभव) | volt | V |
Electrical resistance () | ohm | Ω |
सदिश व अदिश राशी
1)सदिश राशी (Vector Quantity)
ज्या भौतिक राशी दिशा व परिमाण (Direction and magnitude) या दोन्हीही प्रकारात दर्शवितात त्यांना सदिश राशी म्हणतात. (सदिश राशी दर्शविताना डोक्यावर बाण काढतात)
उदा. बल (Force), विस्थापन (Displacement), वेग (Velocity) etc. i.e. F, S, V
2) अदिश राशी (Scalar Quantity)
ज्या भौतिक राशी परिमाणाने दर्शवता येतात. दिशा नसते त्यांना अदिश राशी म्हणतात.
उदा : वजन (Mass), वेळ (Time), चाल (Speed) etc
वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम-इरिडीयम संमिश्राचा एक भरिव दंडगोल पॅरीस येथील अंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. याच्या वस्तूमानालाच एक किलोग्रॅम म्हणतात.
TMC
TMC म्हणजे One thousand Million Cubic Feet म्हणजे एक अब्ज घनफूट पाणी होय.
1 TMC = 28316846592 लीटर किंवा 28.317 अब्ज लीटर