one-stop-centre-scheme-for-womens
one-stop-centre-scheme-for-womens

वन स्टॉप सेंटर स्कीम

1) केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने एप्रिल २०१५ पासून देशात ‘वन स्टॉप सेंटर’ योजना सुरु केली आहे.
2)महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात येतात.
3) या सेंटरमध्ये पोलीस सहाय्य, आरोग्य सहाय्य, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक समुपदेशन आदी सुविधांसोबतच पिडीत महिलेला ५ दिवस वास्तव्याची सुविधाही पुरविण्यात येते.
4) योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत १८२ सेंटर्स उभारण्यात आली असून ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १ लाख ३० हजार महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
5) अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोचविण्यासाठी देशातील ९ राज्यात नव्याने १०० ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यास नव्याने महिला व बाल कल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
6) महाराष्ट्रात वर्धा येथे असे सेंटर उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.