राष्ट्रीय आविष्कार अभियान
राष्ट्रीय आविष्कार अभियान

राष्ट्रीय आविष्कार अभियान

सुरुवात

राष्ट्रीय आविष्कार अभियानाची सुरुवात नवी दिल्ली येथून 9 जुलै, 2015 रोजी पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या द्वारे करण्यात आली.

उद्देश

शाळेतील मुलांनी विज्ञान व गणित विषयांमध्ये गोडी उत्सुकता व जागरूकता निर्माण करणे त्याचबरोबर त्या विषयांमधील ज्ञान घेणे व संशोधन करण्यास प्रोत्साहन करणे.

राष्ट्रीय आविष्कार अभियानाचे नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान असे करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान विध्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून विज्ञान शिकवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून ओळखले जाते.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया विजन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ओळखले जाते.

या अभियानाअंतर्गत सरकारी शाळांना IIT/IIM/IISER व इतर केंद्रीय विद्यापीठ व प्रमुख संघटनांद्वारे नवनवीन कार्यक्रम विज्ञान प्रदर्शने तसेच विद्यार्थ्यांच्या भेटी इत्यादींमार्फत माहिती उपलब्ध करण्यात येईल त्याद्वारे विज्ञान आणि गणित विषयासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल.

उच्चशिक्षणासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियानाचा दुसरा टप्पा जानेवारी 2016 मध्ये सुरू करण्याची घोषणा मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या द्वारे करण्यात आली.

या अभियानाअंतर्गत पूर्वेकडील सर्व राज्यांतील जिल्ह्यांमध्ये मॉडल विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.