ग्रामीण LED स्ट्रीट लाइटिंग योजना
ग्रामीण LED स्ट्रीट लाइटिंग योजना

ग्रामीण LED street light योजना

भारत सरकारद्वारे विद्युत मंत्रालयाअंतर्गत energy efficiency सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) च्या माध्यमातून आंध्र प्रदेशातुन ग्रामीण LED street लाइटिंग योजना सुरू करण्याची घोषणा 6 जून 2017 रोजी करण्यात आली.

आंध्रप्रदेशातील सात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये 10 लाख पारंपारिक स्ट्रीट लाईटच्या जागेवर एलईडी लाईट लावण्यात आले.

ही भारत सरकारची स्ट्रीट लाइटिंग राष्ट्रीय योजनेअंतर्गत देशामध्ये ग्रामीण एल इ डी स्ट्रीट लाइटिंगशी जोडलेली पहिली योजना आहे.

प्रमुख मुद्दे

ग्रामीण भागांमध्ये जळाऊ लाकूड व कोळसा इंधनाचा वापर केल्याने कार्बन-डाय-ऑक्‍साईड अधिक निर्माण होतो. या योजनेतून 12 कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड कमी करण्यास मदत होईल.

या योजनेतून ग्रामपंचायतीस प्रत्येक वर्षी एकूण जवळजवळ 147 दशलक्ष युनिट विजेची बचत करण्यास मदत मिळेल.

पहिल्या टप्प्यामध्ये गुंटूर, प्रकाशम, नेल्लोर, कुरनूर, कडप्पा, अनंतपुर आणि चित्तूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये बदल करण्यात येतील.

या योजनेसाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा पुरवठा एक फ्रांसीसी विकास एजंसी द्वारे करण्यात येईल।

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.