लकी ग्राहक योजना
लकी ग्राहक योजना

लकी ग्राहक योजना

15 डिसेंबर, 2011 रोजी रोकडरहित डिजिटल पेमेंट व्यवहारास चालना देण्यासाठी सरकारद्वारे लकी ग्राहक योजनाडीजी धन व्यापार योजना व्यापाऱ्यांसाठी लागू करण्यात आली.

लकी ग्राहक योजना ही सामान्य नागरिकांसाठी जे डिजिटल पेमेंट करतील वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.

लकी ग्राहक योजने अंतर्गत येणारे बक्षीस

 1. या योजनेअंतर्गत व्यक्ती वेगवेगळ्या बक्षीस रककमेस पात्र ठरू शकतो.
 2. या योजनेअंतर्गत प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवडा व शेवटी एक मेगा लकी ड्रॉ काढला जाईल.
 3. ही योजना 8 नोव्हेंबर, 2016 ते 13 एप्रिल, 2017  पर्यंतच्या डिजिटल transaction साठी चालू करण्यात आली.

दैनिक लकी ड्रॉ

 1. रोज 15000 व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
 2. आर्थिक विजेत्यास हजार रुपये वितरित करण्यात येते.
 3. सलग 100 दिवस पुरस्कार चालत राहतील.

साप्तामेगा पुरस्कारहिक लकी ड्रॉ

या अंतर्गत प्रत्येक आठवड्याला 7000 व्यक्तींना तीन प्रकारचे पुरस्कार देण्यात येतील.

 1. प्रथम श्रेणी विजेत्यास 1,00,000 लाख रुपये देण्यात येतील.
 2. द्वितीय श्रेणी विजेत्या 10,000 रुपये देण्यात येतील.
 3. तृतीय श्रेणी विजेत्यास 5,000 रुपये देण्यात येतील.

मेगा पुरस्कार

14 एप्रिल, 2017 रोजी या योजनेचा मेगा ड्रॉ काढण्यात येईल. यामध्ये 9 नोव्हेंबर, 2016 पासून 13 एप्रिल, 2017 दरम्यान काढण्यात आलेल्या कोणत्याही डिजिटल पेमेंट साठी आपण विजेता बनू शकतो. यामध्ये तीन श्रेणी काढण्यात येतील.

 1. प्रथम पुरस्कार विजेत्यास मिळतील – एक कोटी रुपये
 2. दुसऱ्या पुरस्कार विजेत्यास – 50 लाख रुपये
 3. तिसऱ्या पुरस्कार विजेत्यांस – 25 लाख रुपये

लकी ग्राहक योजनेअंतर्गत सरकार द्वारे व नोव्हेंबर 2016 ते 13 एप्रिल 2017 या कालावधीदरम्यान 340 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत।

लकी ग्राहक विजेत्याची निवड  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी 14 एप्रिल 2017 रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.

लकी ग्राहक योजना विजेत्यांचे चार गट करण्यात आले आहेत।

 1. रूपे या गटात दररोज 11900 विजेते
 2. यूपीआय  गटात दररोज पंधराशे विजेते
 3. एईपीएस गटात दररोज पंधराशे विजेते
 4. यु एस एस डी गटात रोज शंभर विजेते

यूएसएसडी आधारित प्रणालीत इंटरनेटची गरज नाही फोन वरील स्टार 99 हा क्रमांक डायल केल्यानंतर बक्षिसाची रक्कम निर्गमित केली जाईल.
मोबाईल आधारीत ॲप वर ही यातील बक्षिसांची रक्कम देण्यात येईल. यात अनेक बँका समाविष्ट करण्यात आल्या.
आधार कार्ड प्रणाली फोन मोबाईल व इंटरनेटची गरज नसून केवळ आधार कार्ड वरील अंगठ्याच्या निशाणीचा पर्याय उपलब्ध असेल.
या योजनेचा लाभ अशा व्यक्तींना देण्यात येईल ज्यांनी कॅशलेस पेमेंट 50 रुपये ते 3,000 रुपये पर्यंत केली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.