swachh bharat abhiyan
swachh bharat abhiyan

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2014 रोजी महात्मा गांधीजींच्या 145 व्या जयंतीदिवशी दिल्लीमधील वाल्मिकी नगर मधून करण्यात आली.

उद्देश :- प्रत्येक गल्ली, इलाका रस्ते 2 ऑक्टोंबर, 2019 पर्यंत स्वच्छ करणे.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची  पुनर्रचना करून करण्यात आली आहे

 

स्वच्छ भारत अभियान दोन टप्प्यात विभागण्यात आले

 

स्वच्छ भारत अभियान ग्रामीण हे अभियान केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणार आहे

स्वच्छ भारत अभियान शहर हे अभियान केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणार आहे

स्वच्छ भारत अभियानाची गरज

हे आवश्यक आहे की भारताच्या प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे त्याचबरोबर उघड्यावर शौचास बसण्याची प्रवृत्ती समाप्त करण्याची गरज आहे.

याच्या मार्फत करण्यात येणारी साफसफाई ची व्यवस्था मुळापासून समाप्त करणे.

प्रमुख उद्देश :- 2021 पर्यंत देशातील स्वच्छतेची पातळी वाढवून संपूर्ण देश स्वच्छ करणे.

स्वच्छ भारत अभियान पूर्ण करण्यासाठी सरकारने सर्व जनतेस विनंती केली आहे की ते आपल्याजवळील व दुसऱ्या जागेतील स्वच्छतेसाठी वर्षांमध्ये फक्त 100 तास स्वच्छतेसाठी द्या.

स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यासाठी धोरण आणि काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये तीन टप्पे आहेत.

  1. योजना टप्पा
  2. कार्यवाही टप्पा
  3. सातत्य टप्पा

काय आहे स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान एक राष्ट्रीय स्वच्छता मोहीम आहे जी भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शहराचे रस्ते, फुटपाथ मार्ग आणि इतर ठिकाणे समाविष्ट होतात.

महानगरपालिकेच्या कचऱ्याचे निर्मूलन व त्याचा पुन्हा योग्य वापर  सुरक्षित विल्हेवाट वैज्ञानिक पद्धतीने मलव्यवस्थापन करणे.

स्वतःच्या आरोग्यसंबंधी भारतीय जनतेच्या विचार व स्वभाव मध्ये बदल करणे त्याचबरोबर आरोग्यपूर्ण साफ-सफाई प्रक्रियेचे पालन करणे.

याअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींनी स्थानिक पातळीवर कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जागतिक पातळीवरील जागरूकता निर्माण करण्यासाठी व सामान्य जनतेस आरोग्यपूर्ण जीवनाशी जोडण्यासाठी या अभियानाची गरज आहे.

संपूर्ण भारतामध्ये साफसफाईची सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी क्षेत्राची भागीदारी वाढविणे.

भारता स्वच्छ बनविणे.

ग्रामीण भागांमध्ये जीवन स्थळाच्या गुणवत्तेमध्ये बदल घडवून आणणे.

आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून समुदाय व पंचायती राज्य संस्थेत सतत साफसफाई संबंधी जागरूक करणे.

कोरड्या शौचालयांचे रूपांतर पाण्याच्या स्त्रोतांचा वापर असणाऱ्या सौचालयात करणे.

सामुदायिक स्वच्छतागृह बांधण्यामध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रोत्साहित करणे.

शहरी भाग स्वच्छ भारत अभियान

शहरी भागामध्ये स्वच्छ भारत अभियान याचे लक्ष्‍य प्रत्येक शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाबरोबर सरासरी सर्व 1. 04 कोटी घरांना 2.6 लाख सार्वजनिक शौचालय 2.5 lakh सर्वाधिक शौचालय उपलब्ध करणे हे आहे.

सार्वजनिक शौचालयाच्या निर्मितीची योजना झोपडपट्टी भागांमध्ये करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाची सुविधा अवघड आहे. अशाप्रकारे सार्वजनिक शौचालयाची सार्वजनिक ठिकाणी बस स्थानक रेल्वे स्टेशन बाजार इतर ठिकाणी गरज असते.

शहरी भागांमध्ये स्वच्छता कार्यक्रमास पाच वर्षांच्या आत 2019 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे यामध्ये मोठा कचरा व्यवस्थापन व खर्च सरासरी सात कोटी रुपये आहे एक कोटी रुपये सर्वसामान्य जागृत करण्यासाठी आहेत  555 कोटी रुपये सार्वजनिक शौचालयं साठी व चार कोटी रुपये खाजगी घरा अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी इत्यादी याअंतर्गत पुढील लक्ष्य ठेवण्यात आले आहे

  1. उघड्यावर शौच प्रवृत्ती समाप्त करणे
  2. कोरड्या शौचालयाचे रूपांतर पाण्याच्या स्त्रोतांचा वापर असणाऱ्या शौचालयात करणे
  3. मोकळ्या हाताने साफ-सफाई प्रवृत्ती बंद करणे करणे
  4. भेटींच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणणे.
     

ग्रामीण स्वच्छ भारत मिशन

ग्रामीण स्वच्छ भारत मिशन एक असे अभियान आहे ज्या मार्फत ग्रामीण भारतामध्ये स्वच्छता कार्यक्रम राबविले जातात आणि ग्रामीण भाग स्वच्छ बनवण्यासाठी 1999 मध्ये भारत सरकारने निर्मल भारत अभियानाची सुरुवात केली होती त्याचे रूपांतर स्वच्छ भारत अभियान ग्रामीण मध्ये करण्यात आले आहे.

ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश

ग्रामीण भागातील व्यक्तींची उघड्यावरील शौच करण्याची प्रवृत्ती समाप्त करणे

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण लक्ष

ग्रामीण भागातील व्यक्तींच्या जीवन स्तरांमध्ये सुधारणा करणे

2019 पर्यंत स्वच्छ भारत त्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये साफसफाईसाठी प्रेरित करणे

गरजेच्या साफसफाईच्या सुविधा सतत उपलब्ध करण्यासाठी पंचायती राज्य संस्था समुदाय इत्यादींना प्रोत्साहित करणे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जोडल्या गेलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

 

  1. अमिताभ बच्चन
  2. आमिर खान
  3. हृतिक रोशन
  4. सचिन तेंडुलकर
  5. मृदुला सिन्हा
  6. अनिल अंबानी
  7. बाबा रामदेव
  8. शशी थरूर
  9. प्रियंका चोपडा  
  10. कमल हसन
  11. सलमान खान
  12. अमित शहा
  13. वेंकैया नायडू
  14. तारक मेहता का उल्टा चश्मा ची टीम

स्वच्छ भारत अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आमंत्रित व्यक्ती

  1. सचिन तेंडुलकर
  2. कमल हसन
  3. मृदुला सिन्हा
  4. अनिल अंबानी
  5. बाबा रामदेव
  6. शशी थरूर
  7. प्रियांका चोपडा
  8. सलमान खान
  9. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची टीम

 

स्वच्छ भारत अभियान याचे बोधचिन्ह

कोल्हापूरच्या अनंत खासबारदार यांनी तयार केली आहे हे बोधचिन्ह तयार करण्यासाठी बक्षीस म्हणून 50,000 रुपये देण्यात आले.

  1. स्वच्छ भारत अभियानाचे एक कदम स्वच्छता की ओर हे घोषवाक्य गुजरात मधील राजकोट मधील भाग्यश्री सेठ यांनी तयार केले त्यासाठी त्यांना बक्षीस म्हणून 25,000 देण्यात आले.
  1. स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख

    जयंत नारळीकर

    स्वच्छ भारत अभियान याचे ब्रँड ऍम्बॅसिडर म्हणून क्रिकेटर व्ही व्ही लक्ष्मण व बालसुब्रमण्यम यांची निवड करण्यात आली आहे.

    तर महाराष्ट्रातील ब्रँड ऍम्बॅसिडर म्हणून अविनाश धर्माधिकारी व मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे

    स्वच्छ भारत अभियान याचे महत्व

    स्वच्छ भारत अभियान भारत सरकार मार्फत 4041 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सुरू करण्यात आले.

    स्वच्छ भारत अभियानाचा एकूण खर्च 62009 कोटी रुपये आहे त्यामधील 14623 कोटी रुपये केंद्र सरकार द्वारे दिले जातील.

  2. 2019 पर्यंत सर्व ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करणे

स्वच्छ भारत अभियान अनुदान

2019 पर्यंत भारतामध्ये सर्व ठिकाणी पक्की शौचालय बांधणे.

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वैयक्तिक घरगुती सौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान वाटप करण्यात येते

केंद्र सरकारचा हिस्सा रुपये 9,000 राज्य सरकारचा हिस्सा तीन हजार रुपये.

पूर्वेकडील राज्यांत केंद्राचा हिस्सा दहा हजार 800 रुपये राज्य सरकार बाराशे रुपये

ग्रामीण भागातील फुले मलमूत्रविसर्जन संपवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत वीस लाख रुपये वार्षिक अनुदान मंजूर करण्यात येईल.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.