सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना

योजनेची सुरुवात – 1 डिसेंबर, 1997

योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना

उद्देश – शहरी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना स्वरोजगार उद्योगांच्या उभारणीस प्रोत्साहन देणे, त्यांना वेतनसहित रोजगार उपलब्ध करणे व विविध धोरणांतर्गत त्यांच्या श्रमाचा लाभप्रद उपयोग करणे.

या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मध्ये 75:25% खर्च विभागणी करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत दोन विशिष्ट कार्यक्रम निर्माण करण्यात आले

  1. शहरी स्वरोजगार कार्यक्रम (USEP)
  2. शहरी वेतन रोजगार कार्यक्रम (UWEP)

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना अंतर्गत समाविष्ट योजना

  1. नेहरू रोजगार योजना (NRY)
  2. शहरी पायाभूत सुविधा कार्यक्रम (UBSP)
  3. प्रधानमंत्री एकीकृत शहरी गरिबी निवारण कार्यक्रम (PMIVPEP)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.