संयुक्त राष्ट्रे किंवा यूनाइटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघ ही अंतरराष्ट्रीय विधी, अंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य करते आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक अंतरराष्ट्रीय संस्था आहे
संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना – | २६ जून १९४५ |
मुख्यालय – | न्यू यॉर्क, अमेरिका |
सदस्यता – | १९३ सदस्य देश |
अधिकृत भाषा – | अरबी, चीनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश |
सरचिटणीस – | बान-की-मून |
अध्यक्ष – | जोसेफ दाइज |
संयुक्त राष्ट्रांची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवदासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती.
ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम राबविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत. जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांच्या समावेश असणारी १९३ राष्ट्रे तिची सदस्य देश आहेत.
जगभरात असलेल्या कार्यालयांमधुन वर्षभरात होणार्या नियमित बैठकांमधुन संयुक्त राष्ट्र आणि तिच्या खास संस्था प्रशासकीय आणि इतर बाबींवर निर्णय घेतात.
संस्थेची सहा मुख्य विभाग आहेत, आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा), सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी), आर्थिक व सामाजिक परिषद (अंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य) आणि विश्व्स्त संस्था (सध्या अक्रिय).
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इतर प्रमुख संस्था जागतिक स्वास्थ संघटना, जागतिक अन्न कार्यक्रम आणि यूनिसेफ यांचा समावेश होतो.
महासचिव हे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख असून २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाच्या बान-की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणार्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधुन वित्तपुरवठा होतो.