वसंतराव फुलसिंग नाईक
वसंतराव फुलसिंग नाईक
नाववसंतराव फुलसिंग नाईक
जन्म1 July 1913, यवतमाळ
मृत्यू18 August 1979, सिंगापूर
वसंतराव फुलसिंग नाईक

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 1963 ते 1975 (चौथे मुख्यमंत्री)

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.

राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करतो.

पदे

  • इ.स.१९४६ – पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद.
  • इ.स. १९५२ – पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार.
  • इ.स. १९५६ – महाराष्ट्राचे सहकारमंत्री.
  • इ.स. १९५७ – महाराष्ट्राचे कृषीमंत्री.
  • इ.स.१९५८ – आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.
  • इ.स. १९६० – लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष.
  • इ.स. १९६२ – महाराष्ट्राचे महसूलमंत्री.
  • इ.स. १९६३ – ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
  • इ.स. १९७२ – तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री.
  • इ.स. १९७७ – वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.