Antyodaya Anna Yojana अंत्योदय अन्न योजना
Antyodaya Anna Yojana अंत्योदय अन्न योजना
योजनेचे नावअंत्योदय अन्न योजना / Antyodaya Anna Yojana
वर्ष2021
योजना सुरूकेंद्र सरकार द्वारे
विभागअन्न पुरवठा आणि ग्राहक मंत्रालय
लाभार्थीगरीब नागरिक आणि देशातील दिव्यांगजन
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
रेशन2 रुपये किलो दराने गहू
तीन रुपये दराने तांदूळ
उद्देशदारिद्रय रेषेखालील कुटुंबांना खाद्यान्न संरक्षण प्रदान करणे
नफागरिबांना अन्न
श्रेणीकेंद्र सरकारच्या योजना
अंत्योदय अन्न योजना

योजनेची सुरुवात: 25 डिसेंबर 2000

योजनेत कार्यवाही: नववी पंचवार्षिक योजना

उद्देश: – दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना खाद्यान्न संरक्षण प्रदान करणे

अंत्योदय अन्न योजना अंतर्गत देशातील एक कोटी गरीब कुटुंबांना दर महिना सुरुवातीला 25 किलो ग्राम अन्नधान्य दिले जात असे सध्याचे दर महिना 35 किलो ग्राम अन्नधान्य विशेष सवलती दराने उपलब्ध करून दिली जाते

अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू आणि तांदूळ अनुक्रमे दोन रुपये व तीन रुपये किलो प्रति किलोग्राम  दराने उपलब्ध केले जातात

अंत्योदय अन्न योजना खाद्य आणि सार्वजिक मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केली जाते

अंत्योदय अन्न योजना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 70 व्या वाढदिवसा दिवशी सुरू  करण्यात आली

FAQs

अंत्योदय अन्न योजना कधी सुरू झाली?

लोकसंख्येच्या या भागासाठी TPDS अधिक केंद्रित आणि लक्ष्यित करण्यासाठी डिसेंबर 2000 मध्ये एक कोटी गरीब कुटुंबांसाठी ‘अंत्योदय अन्न योजना’ सुरू करण्यात आली.

अंत्योदय कार्डची पात्रता काय आहे?

अर्जदार दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असावा. नियुक्त प्राधिकरणाने जारी केलेल्या अंत्योदय रेशनकार्डसाठी अर्जदाराची निवड करावी. अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र की त्याच्याकडे यापूर्वी कोणतेही शिधापत्रिका नाही.

ही योजना कोणी सुरू केली?

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री शांता कुमार यांनी अंत्योदय अन्न योजना सुरू केली आहे. राजस्थान राज्यात ही योजना प्रथमच लागू करण्यात आली.

Antoday रेशन कार्डवर काय उपलब्ध आहे?

अंत्योदय शिधापत्रिकाधारकास दर महिन्याला ३५ किलो रेशनचे वाटप केले जाईल, म्हणजे २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ. लाभार्थ्यांना ३ रुपये प्रति किलो दराने से व तांदूळ दिले जातील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.