६वा ब्रिक्स चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२१ जाहीर
६वा ब्रिक्स चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२१ जाहीर

६वा ब्रिक्स चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२१ जाहीर

गोव्यातील ५२ व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival of India)’ नुकतीच ‘ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या (BRICS Film Festival awards)’ ६ व्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

परथमच BRICS चित्रपट महोत्सव IFFI सोबत आयोजित करण्यात आला होता.

२० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान याचे आयोजन करण्यात आले होते.

परस्कार विजेते :

सर्वोत्कृष्ट चित्रपट: दिग्दर्शिका एमी जेफ्ता यांच्या दक्षिण आफ्रिकन चित्रपट ‘बरकत (Barakat)’ आणि दिग्दर्शक ल्युबोव बोरिसोवा यांच्या ‘द सन अबव्ह मी नेव्हर सेट्स (The Sun above Me Never Sets)’ या रशियन चित्रपटाने संयुक्तपणे सदर पुरस्कार जिंकला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ब्राझिलियन चित्रपट निर्माते लुसिया मुरात यांना तिच्या ‘अ‍ॅना (Ana)’ माहितीपटासाठी सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) पुरस्कार: भारतीय अभिनेता धनुषला ‘असुरन’ मधील भूमिकेसाठी मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री) पुरस्कार: ब्राझिलियन अभिनेत्री लारा बोलडोरिनी हिला ‘ऑन व्हील्स (On Wheels)’ मधील भूमिकेसाठी मिळाला आहे.

जयुरी विशेष उल्लेख (Jury Special Mention) पुरस्कार: दिग्दर्शक यान हान यांना त्यांच्या ‘अ लिटल रेड फ्लॉवर फ्रॉम चायना (A Little Red Flower from China)’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.